कार्यक्रम २०१० - संक्रांत



नमस्कार मंडळी,

मकरसंक्रातीचा कार्यक्रम हा मंडळाचा नववर्षात होणारा पहिला कार्यक्रम. या वर्षी  हा कार्यक्रम नॉर्मल कम्युनिटी वेस्ट हायस्कूल येथे दिनांक १६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.

या वर्षीच्या कार्यक्रमाचे स्वरूप मात्र अत्यंत वेगळे आणि खास होते,  आणि त्याला कारणही तसेच होते….संक्रांती बरोबरच साजरा होत होता आपल्या मंडळाचा “ दशकपूर्ती सोहळा “. आणि त्या साठी आयोजीत केला होता “आनंद मेळा”

हळदीकुंकु, आणि तीळगुळाने  प्रवेशद्वाराशीच सगळ्यांचे स्वागत करुन द्शकपूर्ती निमित्त सर्वांना मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) असलेले स्मृतीचिन्ह देण्यात आले…. या स्मृतीचिन्हाचे अत्यंत आकर्षक डिझाईन केले आहे आदिती साठे यांनी.

बाह्य हवामानाच्या थंडीचा विचार करुन कार्यक्रम स्थळी आल्या आल्या सगळ्यांकरिता चहा / कॉफी ची  व्यवस्था केली होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री. अभिजीत नेरुरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली

संक्रातीला लहान मुलांचे “बोरनहाण” करण्याच्या प्रथेला अनुसरुन कार्यक्रमाला उपस्थीत सर्व ५ वर्षाखालील मुलांचे बोरनहाण करण्यात आले अर्थात इथे अमेरिकेत “बोरं” कुठुन आणणार ? म्हणुन मुलांचे “चॉकलेट नहाण” केले म्हणायला हरकत नाही…चॉकलेट बरोबरच रंगीबेरंगी कागदी फुलांची आणि चकचकीत कागदी चकत्यांची या बालकांवर उधळण करण्यात आली…उधळलेला खाउ वेचता वेचता मुलांच्या ओंजळी भरुन गेल्या.

त्यानंतर मंडळाच्या दहाव्या वर्धापनानिमित् मंडळाच्या कार्यकारीणीच्या सर्व सदस्यांनी सामुहिकरीत्या केक कापला.द्शकपूर्ती निमित्त सर्वांना मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) असलेले जे (magnet) स्मृतीचिन्ह देण्यात आले….त्याच स्मृतीचिन्हाच्या “फोटो आयसिंग” ने  केक अत्यंत आकर्षक असा सुशोभीत  केला होता.

यानंतर दाखवण्यात आला मंडळाची दहा वर्षाची यशस्वी वाटचाल सांगणारा माहितीपट (documentary) “वाटचाल” …या महितीपटात दहा वर्षांपूर्वी मंडळ कसे सुरु झाले, पहिला कार्यक्रम कुठे आणि कसा झाला, हळू हळू मंडळाचे  विस्तारत गेलेले स्वरूप, वाढता प्रतिसाद याची माहिती नमूद करण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे गेल्या दशकातील कार्यक्रमांचे व्हिडीओ, फोटो यांचा समावेश् होता.या कार्यक्रमातून भाग घेतलेल्या कलाकारांच्या, आणि बालकलाकारांच्या पालकांच्या मंडळा बद्द्लच्या बोलक्या प्रतिक्रियांचाही यात आहेत. सध्या भारतात असलेल्या माजी सदस्यांनी, आणि मंडळाच्या सध्याच्या कार्यकर्त्यांनी मंड्ळाला दिलेल्या शुभेच्छा आणि कामकाजा बद्दल दिलेली माहीतीही यात पहायला मिळते. अशा या आकर्षक लघुपटाने प्रेक्षकांच्या स्मृती उजळल्या नवीन सदस्यांना मंडळाची आधीची वाटचाल समजली.

या माहितीपटाची श्रेयनामावली खालील प्रमाणे

संकल्पना अभिजीत नेरुरकर 
लेखन/दिग्दर्शन गौतम करंदीकर
निवेदन गौतम आणि गौरी करंदीकर
व्हिडिओ चित्रण व संकलन हेमंत कुलकर्णी
विशेष सहाय्य मोहीत पोतनीस, निवेदिता कुलकर्णी


त्यानंतर सुरु झाला धमाल  “आनंद मेळा”  अर्थात फन फेअर. यात होते लहानथोरांना आवडतील आणि खेळता येतील असे खेळाचे विविध स्टॉल्स या स्टॉल्स मुळे संक्रातीच्या या उत्सवाला अगदी जत्रेचे स्वरूप आले. लहान मुलांकरता असलेल्या ्टॉल्स चे वैशीष्ट्य म्हणजे या खेळांचे नियोजन ८-१० वयोगटातील लहान मुलेच बघत होती.

या बरोबरच सुरु होती “खाद्यजत्रा”…भेळ, समोसा चाट, कच्छी दाबेली, या खमंग मेन्युने मंडळी अगदी खुष झाली. सभागृहात उत्साहाचं उधाण आलं होतं विविध खेळ मनसोक्त खेळून झाल्यानंतर , खमंग पदार्थांचा आस्वाद घेत बसण्या साठी एके ठिकाणी निवांत बसण्याची सोय होती आणि तिथेच स्क्रीन वर आजपर्यंत मंडळात झालेल्या विविध सांस्कृतीक कार्यक्रमांच्या व्हिडिओ आणि फोटोंचे प्रक्षेपण सतत चालू होते. याचे संकलन आणि प्रक्षेपण केले होते मोहित पोतनीस यांनी.

अशा या उत्सवरूपी आनंदयात्रेत सहभागी झालेल्यांचा सभागृहातून बाहेर पाय निघत नव्हता पण शेवटी वेळेच्या मर्यादेनुसार आवरते घ्यावे लागले..

संपूर्ण कार्यक्रमाचे नेट्के संयोजन केले होते अर्चना नाडकर्णी यांनी.
या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनात खालील कार्यकर्त्यांचे  मोलाचे सहकार्य् होते …

कार्यक्रम संयोजन अर्चना नाडकर्णी
सजावट अनुजा दुर्वास, प्रियांका पंडीत, ज्योती पाटील, 
प्रिती पाटील, शिल्पा खापरे, विभा महाजन
हळदीकुंकु अनुराधा गोडबोले, पूनम पलांडे, अलीशा नाडकर्णी, 
सानिका बुचे,श्रिया मालपाणी, गार्गी खेर
तीळगूळ वडी निवेदिता कुलकर्णी, तनुजा पागनीस, अनुराधा गोडबोले, 
चेतना शेंडे, विभा महाजन, गौरी करंदीकर, अर्चना नाडकर्णी
चहा /कॉफी श्वेता जामसंडेकर, मीनल लिमये, निवेदिता कुलकर्णी, चेतना शेंडे
मदत मधुरा सावंत, प्राची परांजपे  
लहान मुलांचे स्टॉल्स अलीशा नाडकर्णी, सानिका बुचे, गार्गी खेर, श्रिया मालपाणी, 
तेजस इदाते, सुहृद राउत, अक्षय बुचे 
मोठ्यांचे स्टॉल्स विभा महाजन, मीनल गुर्जर, अनुजा दुर्वास, शिल्पा वाघ, रती पेडणेकर, 
तृप्ती शिंपी, प्रिती पाटील, श्वेता जामसंडेकर,श्रेया देसाई
उज्वला जाधव, श्वेता बनसोड, प्रियांका पंडीत, विनोद म्हसे
ज्योतीष स्टॉल अनिरुद्ध गोड्बोले 
मेहंदी स्टॉल सम्राज्ञी शिंदे
माहितीपट प्रक्षेपण हेमंत कुलकर्णी, मोहित पोतनीस
तिकिट विक्री कुणाल लाड, मकरंद कुरुंदकर, सुदर्शन पलांडे, विनोद म्हसे,युवराज सोनवणे,
लक्ष्मण चौधरी,पंकज शहा, उदय परांजपे,नितीन महाजन,योगेश सावंत
अभी शेंडे,निवेदिता कुलकर्णी, अक्षता कामत,बाळकृष्ण कामत,
कार्यक्रम व्यवस्था अभी शेंडे,योगेश सावंत, सचिन बुचे,नितीन महाजन, मकरंद कुरुंदकर
छायाचित्रकार रोहन गुर्जर

दशकपूर्ति माहितीपट (documentary)
कार्यक्रमाची छायाचित्रे
दशकपूर्ती स्मृतीचिन्ह
मंडळाला आलेली शुभेच्छा पत्रे!

-- आश्लेषा राउत