अभिप्राय - मंडळाच्या दशकपूर्ति २०१० च्या वेळी आलेली शुभेच्छा पत्रे!

================================================

From: Mayuresh Deshpande
Sent: Saturday, January 16, 2010 1:00 PM

मंडळाच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त मंडळाच्या आजी-माजी सर्व सभासदांचं मनापासून अभिनंदन. आजचा दिवस खरंच महत्वाचा आहे, कारण १० वर्ष सातत्यानं अनेक अडचणींना तोंड देत, लोकांचे नवे-जुने लोंढे सामावून घेत, मराठी संस्कृतीच्या प्रसाराचं, सातासमुद्रापार आलेल्या हौशी मंडळींच्या कलागुणांना वाव देण्याचं हे काम चालू ठेवणं, ही खरंच दृष्ट लागावी अशीच भरीव कामगिरी आहे. ती कामगिरी जवळून पाहिलेला, अनुभवलेला, त्यात न्हालेला मंडळाचा मी एक माजी कार्यकर्ता आणि आजन्म सदस्य.

माझे स्वतःचे, कशाला माझ्या सगळ्या कुटुंबाचेच मंडळाने अतोनात लाड केलेत. आम्ही नाटकात कामं केली, एकांकिका बसवल्या, लिहील्या, वेबसाईट बनवायला हातभार लावला, इतकच काय, माझ्या लहानशा मुलाने सलग तीन वर्षं कविता म्हणून मराठीशी कायमचं नातं जोडलं ते इथेच. मी तर सहा वर्ष आधाशासारखी नाटकात पडतील ती सगळी कामं केली, म्हणजे, लाईट्स् केले, मेकअप केला, पोस्टरसाठी फोटो काढले, शीर्षकगीत लिहून दिलं, महत्वाची भूमिका केल्या... म्हणजे कौतुक नाही, तर मंडळानं जरा डोक्यावरच बसवलं म्हणा ना... खरं सांगायचं तर उदंड प्रेम दिलं.. अमेरिकेत, आईपासून लांब असणा-याला आपल्या सगळ्यांची जी थोरली आई, मायमराठी तिच्या सेवेची जी संधी मंडळानं दिली, काही आजन्म मित्र दिले ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही.

खरं तर मंडळानं मला जीवनाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी दिली. मायमराठीवर माझं इतकं प्रेम आहे, माझ्या अंगात आईच्या रक्ताबरोबरच तिचीही इतकी घट्ट् गुणसुत्र आहेत हे मंडळाच्या कामामुळे मला जाणवंलं. ब्लुमिंग्टन् नावाच्या प्रेमाच्या गावाला मी परत येईन न येईन, पण मंडळाच्या या भारलेल्या दिवसांना मी कधीच विसरणार नाही, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जडणघडणीत असलेला मंडळाचा हा भाग हे मंडळाचं आमच्यावरचं न उतरणार ऋण आहे...

================================================

From: Ashwini Deshpande
Sent: Saturday, January 16, 2010 1:00 PM

अश्विनीचे विचार

ब्लुमिंग्ट्न् मराठी मंडळाच्या १०व्या वर्धापनदिनासाठी मी अश्विनी देशपांडे पुण्याहून तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. खरं म्हणजे दृक्-श्राव्य माध्यमांतून या शुभेच्छा द्यायला आवडलं असतं, पण भारतातल्या धावपळीत नाही जमलं, म्हणून हा वाचन-प्रपंच

२००४ ते २००९ म्हणजे अगदी गेल्यावर्षीच्या संक्रांतीच्या कार्यक्रमापर्यंत माझा मंडळाबरोबर काम करायचा योग होता. मला अजूनही आठवतात ते सुरवातीचे दिवस. अमेरिकेत येऊन चारच दिवस झाले होते, आजूबाजूला कोणीही शेजारी, ओळखीचं नव्हतं, खूप सारा एकटेपणा आणि भयाण शांतता. अशाच एका संध्याकाळी करंदीकरांच्या बेसमेंटमध्ये ऋणानुबंध नाटकाची प्रॅक्टीस बघायला म्हणून गेले आणि मराठी मंडळाबरोबर कायमचे ऋणानुबंध जोडून आले. कॉलेजनंतर तब्बल १२ वर्षांनी मला पुन्हा स्टेजवर कामं करायला मिळाली, नाटकाशी, मराठी मातीशी पुन्हा नाळ जोडली गेली ती केवळ आपल्या मंडळामुळेच.

पुढे मंडळासाठी मी वेगवेगळ्या कल्पना म्हणजे कलाप्रर्दर्शन, फोटो एक्झिबिशन मांडल्या, गौरीच्या सततच्या प्रोत्साहनामुळे, नेहमी काहीतरी नवं करायचं हे ठरलेलंच असायचं. गौरीला मी खरंच खूप मिस् करते याठिकाणी. माझ्या वास्तव्यात सगळ्यात हायलाईट् म्हणजे ६ ते ६० वयोगटातील १६ बायकांना घेऊन लिहीलेली, बसवलेली नाटिका, काऊंटडाऊन ट्वेंटी वन् ही २००५ च्या संक्रातीच्या कार्यक्रमात केलेली. आम्ही दोघी-तिघी सोडल्या तर सर्वजणी पहिन्यांदाच नाटकात काम करत होत्या, सुरवातीला लाजण्याबुजणा-या या मुलींनी नंतर स्टेजवर मस्तच धमाल उडवून दिली. माझी पक्की खात्री आहे नाटकात काम करायचंय, नवीन कल्पना मांडायचीय, मंडळ तुमचं निश्चितच स्वागत करील.

आता मी भारतात परतलीय, जॉब वगैरे छान सेटल् झालीय. नाटकात काम करायला पुन्हा जमेल की नाही माहित नाही. पण दरवर्षी गुढीपाडव्याला मराठी मंडळाच्या नाटकाची आठवण होईल हे मात्र नक्की.

================================================

From: Anjali Sardesai
Date: Thursday, February 4, 2010, 2:24 PM

नमस्कार.

तुमच्या मंडळाला हार्दिक शुभेच्छा!! उत्तरोत्तर बहराला येवो!!

"Bloomington Normal Marathi Mandal Documentary" आम्ही (म्हणजे मी आणि काका) आज पाहिली. फारच छान झाली आहे. आमच्या सारख्या तिकडे येऊन गेलेल्या मंडळींना तर ती खूपच आवडेल. चारही व्हिडिओ पाहिले.

नचिकेतची आई (अंजली सरदेसाई)

================================================

From: Ashelesha Arun Shinde
Date: Wednesday, January 27, 2010, 8:49 AM

"मराठा तितुका मेळवावा …मराठी धर्म जागवावा “ ब्लूमिंग्टन नॉर्मल मराठी मंडळाने हे अक्षरश: खरे करुन दाखवले आहे.मंडळाच्या दशकपूर्ती निमित्त अनेक शुभेच्छा !

मित्रांनो आम्ही काही काळ ह्या मंडळाचा भाग होतो, नंतर कामा निमित्त ब्लूमिंग्टन सोडावे लागले. परंतु मंडळ आम्हाला विसरले नाही हा अनुबंध असाच टिकावा हि सदिच्छा !

- अरुण शिंदे

ब्लूमिंग्टन मराठी मंडळाचा विषय निघाला कि एखादि स्त्री आपल्या माहेरच्या विषयी जशी जिव्हाळ्याने बोलते तशी मंडळी भरभरुन बोलताना दिसतात. इतका जिव्हाळा आणि आपुलकी निर्माण करण्यात मंडळ यशस्वी झालयं. मुलगी लग्नं झाल्यावर सासरी जाते तशी मी ब्लूमिंग्टनला आले. आपला देश सोडून आपण परदेशात येतो तेंव्हा नुसता देश सोडलेला नसतो तर आपलं कुटुंब , नातेवाईक, मित्रमंडळी, आपली संस्कृती, आपली भाषा, आपली माती सोडलेली असते. आपला परदेशात टिकाव लागेल का अशी धाकधुक मनात असते.मी ब्लूमिंग्टनला आले आणी जेंव्हा मंडळाची सदस्य झाले तेंव्हा भारतातील महाराष्ट्रा बाहेर ब्लूमिंग्टन मधेही एक महाराष्ट्र नांदतो आहे असे जाणवले.ही जाणीव इतकी छान होती…!

मंडळात अनेक उपक्रम चालतात सांस्कृतीक आणि मनोरंजनपर कार्यक्रम होतात यातून विचारांची देवाणघेवाण तर होतेच पण या ही पलीकडे मंडळाच्या माध्यमातून अनेक मित्र आणि शुभचिंतक मिळतात,जिवाभावाची नाती फुलतात,आपुलकी निर्माण होते.. ही उबदार नातीच आपलं परदेशातील वास्तव्य सुसह्य करतात.

अमेरिके मधे जन्म झालेल्या आजच्या नविन पिढीला आपल्या संस्कृतीची पहिली ओळख मंडळ करुन देते.परदेशात पहिल्यांदाच येणा-यांसाठी मंडळ वाटाड्या बनते.
अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ज्यांना दैनंदीन कामकाजा व्यतिरिक्त कही तरी वेगळे करावे अशी इच्छा आहे अशा सर्वांची उर्मी आणि उर्जा ह्यांचा समर्पक वापर करुन मंडळाचे कार्यक्रम सादर होतात. ब्लूमिंग्टन मराठी मंडळ ही ब्लूमिंग्टनची सांस्कृतीक जीवनवाहिनी आहे.

तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मंडळाला दशकपूर्ती निमित्त अनेक शुभेच्छा..!

आश्लेशा शिंदे

================================================

From: Smita Ronghe
Date: Wednesday, January 27, 2010, 8:32 AM

ब्लूमिंग्टन नॉर्मल मराठी मंडळाला दहा वर्ष पूर्ण झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा..!

डॉक्युमेंटरी बघुन मी अक्षरश: Trans state मधे गेले.. जुन्या आठवणी आणि आपली माणसं बघुन खुप छान वाटलं. आम्ही आजपर्यंत इतकी enthu लोकं कुठेच बघितली नाही..!!आम्ही BMM ला खुप miss करतो..!!!!

KEEP UP THE GOOD WORK...BMM....!!!!

स्मिता आणि अमित

================================================

From: Veda Pankaj Gokhale
Date: Saturday, January 16, 2010, 11:41 AM

पहिल्यांदा अभिनंदन मंडळाच्या दशकपूर्ती बद्दल .पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा ..!

भारतातुन आणि ते सुध्दा कधीही पुणे न सोडलेल्या आमच्या सारख्या लोकांना ब्लूमिंग्टन सारख्या अनोळखी ठिकाणी आल्यावर मराठी मंडळ हा एक मोठा आधार वाटतो.तेथील वेगवेगळ्या कार्यक्रमातून खुप मित्र मैत्रीणी मिळतात आणि एकटेपणा संपून जातो. मी मंडळात खुप काही शिकले अगदी पहिल्यांदाच संक्रांती साठी खुप तिळाच्या वड्या करुन कॉन्फिडन्स मिळाला. डांन्स परफॉर्म करण्यापासून ते कोरिओग्राफ करण्याचाही आनंद मिळाला.तसच पुण्यात बघायला मिळतात त्याच तोडीची सुंदर नाटकही बघायला मिळाली. मंडळाच्या वरचेवर होणा-या कार्यक्रमातुन लहांनापासून मोठ्यांपर्य़ंत सगळ्यांना खुप आनंद मिळतो आणि आपले कलागुण सादर करायला वाव मिळतो.

ब्लूमिंग्टन मराठी मंडळाच्या स्मृती कायमच्या मनात कोरल्या गेल्या आहेत.

परत एकदा खुप खुप शुभेच्छा…!

वेदा गोखले

================================================

From: Sonali Chandrajeet Patil
Date: Thursday, January 28, 2010, 8:33 AM

नमस्कार,

आम्हा सर्वांतर्फे ब्लूमिंग्टन मराठी मंडळाचे हार्दिक अभिनंदन ..!

डॉक्युमेंटरी खुपच छान झाली आहे. जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. ब्लूमिंग्टन मधील वास्तव्यात मराठी मंडळाच्या माध्यमातून काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मंडळाचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. सध्या भारतात राहूनही आम्ही अमराठी प्रांतात रहात असल्याने आपल्या मराठी मंडळाच्या आठवणी नेहमीच सोबत असतात. ब्लूमिंग्टन मधले ते सोनेरी दिवस आम्ही कधीच विसरु शकणार नाही. आमच्या सारखीच भावना ब्लूमिंग्टन मधून बाहेर गेलेल्या प्रत्येक मराठी माणसाची असणार आहे यात शंका नाही.

मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत रहो आणि मंडळ खुप मोठे होवो अशा मन:पूर्वक शुभेच्छा..!

धन्यवाद
सोनाली, चंद्रजीत आणि सृष्टी

================================================

From: sudhakar joshi
Date: Wednesday, January 27, 2010, 12:43 AM

Namaskar
Nice to recieve the clips on Marathi Mandal.

It is really very interesting to watch the 10 years progress.

Wish you all the success in your efforts.

Since we are part of Bloomington, through our daughter Manasi Joshi, we know the Mandal, and have profusely experience
the activities.

Wish you and members of the group a very happy new year of entertainment which can be described as pleasure with purpose.
.

Sudhakar and Hemalata Joshi

================================================

From: Manasi Agnihotri
Date: Thursday, January 28, 2010, 9:09 PM

Very Nice, keep up the good work. Also thank u for the magnet, its on our fridge to remind us of all the good & creative times.

Manasi

================================================

आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद!

आपले
ब्लुमिंग्टन् नॉर्मल मराठी मंडळ


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००