वाचक लिहितात -- पेरू ट्रेक


वंदना बाजीकर यांनी पेरू येथे ९ दिवसाचा ट्रेक केला त्याची माहिती. फोटो अवश्य पहा.

दिवस १ लिमा सिटी टूर
इथे गव्हरमेंट पॅलेस, कॅथीड्रल, सिटी हाल आणि आर्चबिशप पॅलेस बघण्यासारखे आहेत Miraflores area, downtown व suburb of San Isidro ह्या गोष्टी लक्ष वेधून घेतात. लिमाचे १७ व्या शतकातले एक चर्च (जे आता हेरिटेज आफ वर्ल्ड कल्चर आहे) पाहिले. उत्खनन केलेल्या काही ठिकाणीही भेट देता आली.

दिवस २ लिमा – कुस्को
सकाळच्या विमानाने कुस्को ला गेलो. ढगांच्या गर्दीमुळे ईथे विमान पोचायला बरेचदा उशीर होतो. हे ईंका साम्राज्याचे मध्यवर्ती ठिकाण. पोचल्यावर प्लाझा दि अर्मास बघितला. कुस्को १०,८५६ फुटांवर असल्याने बर्‍‍याच लोकांना हाय अल्टिट्यूड सिकनेस चा त्रास होतो. इथे थोडावेळ आराम करून हवेची सवय करून घ्यावी लागते.

दिवस ३ कुस्को
सकाळी कुस्कोचा बाजार बघितला. त्यानंतर कलोनियल कॅथेड्रल व कोरीकांचा – सूर्यमंदिरला भेट दिली. दुपारच्या जेवणात पेरूविअन जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर दुपारी बर्‍याच ईंकांच्या काळातील ठिकाणांना भेट दिली. Sacsayhuaman चा किल्ला, water temple, Tambo आणि Puka Puka चा छोटा किल्ला ज्याने हल्ल्यांपासून ही ठिकाणे वाचवली. दगडाचे सुंदर बांधकाम व कोरीव कामाचे नमुने इथे बघायला मिळतात.

दिवस ४ कुस्को- सक्रेद वल्लेय्(पवित्र दरी)
बर्फाने झाकलेल्या शिखरांच्या डोंगरातून १ दिवसाचा प्रवास करून प्रसिद्ध अशा पवित्र दरीत पोचलो जी आजही पूर्वीइतकीच भव्य वाटते. दरीच्या कडेकडेने ईंकांच्या अवशेषाच्या बाजूने पायर्‍यांची चढण दिसते. आजूबाजूला संगमरवरी डोंगरांचे खडबडीत सुळके दिसतात. पिसाक हे अंडीजमध्ये कापडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. तुमचं bargaining चे कौशल्य इथे कामास येते. जेवणानंतर Ollantaytambo;(९,१८५ फ्त) नावाच्या एका छोट्या गावात गेलो. तिथे ईंकांच्या काळातला एक किल्ला पाहिला. रात्री तिथेच राहिलो.

दिवस ५ सक्रेद वल्लेय्-माचुपिचु
सकाळी चालत ट्रेन स्टेशन पर्यंत गेलो. Urubamba नदीच्या कडेने हा रस्ता Amazon व माचुपिचुकडे जातो. ढगांच्या गर्दीतून बस आपल्याला माचुपिचुच्या डोंगरमाथ्यावर घेउन येते.(७,८०० फू). तिथले प्रसिद्ध अवशेष बघण्यात वेळ कसा गेला ते कळले नाही. त्यानंतर जवळच असलेल्या Aguas Calientes या गरम पाण्याच्या झर्‍यांना भेट दिली व लोकल जेवणाचा स्वाद घेतला.

दिवस ६ माचुपिचु – कुस्को
सकाळी माचुपिचु येथे सुंदर सूर्योदय पाहिला. तेथे बघण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत. आम्ही Huayna Picchu हे शिखर चढून गेलो. Temple of the Moon ही बघण्यासारखे आहे.या ठिकाणी हिंडताना चांगला स्टॅमिना असण्याची गरज आहे.

दिवस ७ लके टितिकक
हा पूर्ण दिवस अतिशय सुंदर असा पहिल्या वर्गाचा रेल्वेचा प्रवास करून (अल्टिप्लानो) हाय अल्टिट्यूड सिनरी पाहिली. रेल्वे वळणे घेतघेत उंचीवर जाते. पहिला अर्धा प्रवासात अतिशय भव्य अशा अॅडीज पर्वताचे दर्शन झाले. त्याच्या पायथ्याशी दरीत Huatanay नदी दिसते. नंतर हळूहळू आपण माथ्यावरपोचतो. Lake Titicaca च्या बाजूने वसलेल्या पूनोला पोचलो. हा पूर्ण प्रवास १० तासांचा आहे.

दिवस ८ टिटिकाका लेक
सकाळी ८ वाजता पुनो बंदराकडे निघालो. तिथून प्रसिद्ध Uros आयलंडला दिली. त्यानंतर बोटीने Taquile Islands जिथे विणकरांची वस्ती आहे. दुपारी पुनोला परतुन खरेदीचा आनंद घेतला. कपडे खरेदी करण्यास ही चांगली जागा आहे. मासे खाणार्‍यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. लेक टिटिकाका, जिथे ईंका संस्कति जन्मली हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे लेक आहे. (३८१० मी ....१२,५०० फूट समुद्रसपाटीवर). हे लेक १९६ किमी लांब असून साधारण ५६ किमी रूंद आहे. या लेकचे पाणी थंड असल्याने पोहण्यासाठी वापरता येत नाही.

दिवस ९ टिटिकाका लेक – लिमा- परत
पुनोच्या बाहेर ईंकापूर्व साम्राज्याचे अवशेष chullpas दिसतात ते पाहिले. Colla people.Aymara बोलणारी जमात त्यांच्यातल्या प्रतिष्ठीत लोकांना इथे पुरत असत. ४० फूट उंचीच्या ह्या tomb चे बांधकाम आजही लोकांना आश्चर्यात टाकते, अतिशय अवघड अशा ठिकाणी हे बांधकाम इतक्या पूर्वी कसे केले हा प्रश्न आजही लोकांना पडतो. यानंतर लिमाहून मियामीला परत आलो.


पेरू ट्रेकची छायाचित्रे