संक्रांत

जानेवारी २५, २०२० रोजी हिंदू टेम्पल मध्ये संक्रांती निमित्त तीळगूळ समारंभ संपन्न झाला.

यंदाचा विशेष कार्यक्रम होता महाराष्ट्रा वर आधारित क्विझ!
महाराज, महाराणी, सम्राट, सम्राज्ञी अशा ४ टीम्स मध्ये चुरशीचा सामना रंगला आणि महाराज टीम चा विजय झाला. योगेश बेंद्रे, वल्लरी जोशी यांनी quiz चे उत्तम सूत्रसंचालन केले,सीमा बेंद्रे यांनी अचूक timekeeping केले.

सगळ्या बच्चे कंपनीला अण्वेश जोशी यांनी खूप धमाल गोष्ट सांगत एक तास खिळवून ठेवले सगळी मुले अण्वेशकाकांवर एकदम खूष!

समीर आगरकर आणि केदार कुलकर्णी यांनी बनवलेल्या कडक कॉफीने सगळ्यांचे स्वागत केले.

तिळगुळ हळदीकुंकू लहान मुलांचे बोरनहाण असा कार्यक्रम रंगला. जेवणाचा मेनू होता खास झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव , दहीभात.

सगळ्याच volunteers ना खूप खूप धन्यवाद !

तीळगूळ  गौरी करंदीकर आणि रश्मी गोखले
फोटोग्राफी विनय मोकाशी आणि निलेश निरगुडे 
volunteers  सुशील दुर्वास, अनुजा दुर्वास, अर्चना नाडकर्णी, वैशाली मालपाणी
  आशिष डहाके, शर्वरी जोशी, रश्मी मुजुमले, तरन्नूम शेख
  अनन्या रोटकर, प्रीती पाटील, नीता आणि निर्मल जैन

 

कार्यक्रमाची छायाचित्रे

धन्यवाद

आपले

मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल