कार्यक्रम २००८ - संक्रांत


"नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे,
तिळगुळ-हलव्यासंगे अधिक दृढ करायचे.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.... "


असे म्हणतच जणू मकर संक्रांत येते. सर्व ब्लुमिंग्ट्नवासीय मराठी मंडळीना कडाक्याच्या थंडीत एक उबदार दिलासा देणार्‍या संक्रांतिच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा होते आणि मग सगळेच जण मनातील सारी मरगळ झटकून उत्साहाने कार्यक्रमाच्या तयारीला लागतात. या वर्षीचा संक्रांतीचा कार्यक्रम १९ जानेवारी रोजी ब्लुमिंगटन हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या काही वर्षात आपल्या मराठी मंडळाचा मकर संक्रांतीचा कार्यक्रम म्हणजे फक्त स्त्रियांचा सहभाग असे या कार्यक्रमाचे स्वरुप झाले होते. पण या वर्षीच्या कार्यक्रमात स्त्रियांच्या बरोबरीने पुरूष मंडळींनीही उत्साहाने विविध कलागुणदर्शनात भाग घेतला.

विविध कलागुणदर्शनाची सुरुवात 'माझे गाणे' या मराठी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने झाली. यामध्ये अनंत गोखले, देवयानी गोडसे, केदार भागवत, प्रीती जांभळकर, पुष्कराज जहागिरदार, समीर बिल्डीकर, समीर खिलारे, शिल्पा वाघ आणि श्वेता जामसंडेकर यानी गीते सादर केली. या गीतपर कार्यक्रमाचे निवेदन लिहिले होते देवयानी गोडसे यानी तर ते सादर केले माधुरी माटे यानी. की-बोर्ड वर होते प्रसन्न माटे तर तबल्याची साथ दिली होती मयूरेश मोडक यानी.

या नंतर 'साड़ी उडाली आकाशी' ही अनिल सोनार यांनी लिहिलेली, गौरी करंदीकर दिग्दर्शित विनोदी नाटिका सादर करण्यात आली. स्त्री स्वभावाच्या विविध पैलुंचे चित्र मांडणार्‍या या नाटिकेला प्रेक्षकांची खूपच वाहवा मिळाली. या नाटिकेमध्ये सहभाग होता सोनाली पाटील, सोनल पाटील, सोनल परब, प्रिया चौधरी, मयुरा सत्तुर आणि पल्लवी टकले यांचा.

विविध कलागुणदर्शनाची सांगता 'उदे ग अंबे उदे' या नृत्याने झाली. देवीचा गोंधळ, देवीची आरती आणि तांडव यांच्या उत्कृष्ट समन्वयातून प्रदर्शित केलेले हे नृत्य म्हणजे या वर्षीच्या संक्रान्तिच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. प्रेक्षकानी या नृत्याला प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळे लोकाग्रहास्तव हे नृत्य पुन्हा सादर केले गेले. या नृत्यामध्ये सहभागी झालेले कलाकार होते सुनयना मोहिते, आश्लेषा राउत, मंगल नरसाळे, सोनाली गोखले, भवानीप्रसाद रामदासी, भार्गवी रामदासी, अमित मनोहर, स्नेहा सावुरकर, निनाद वैद्य, श्रद्धा गावडे, अनंत गोखले, शर्मिला भोसले-काळे, पूनम येरुणकर, मेधा मनोहर, जयेश मोहिते, अमोल परब, सयेश प्रकाश आणि समीर खिलारे. नृत्य दिग्दर्शन केले होते जयेश मोहिते यानी. चलचित्र

अशा तर्‍हेने रंगलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वानी अल्पोपहाराचा आनंद घेतला आणि सर्व जण आनंदाने घरी परतले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मुख्य व्यवस्थापन केले होते गौरी करंदीकर यांनी.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालील स्वयंसेवकानी परिश्रम घेतले:

अल्पोपहार व्यवस्था: सचिन बुचे, सुदर्शन पलांदे, अभी शेंडे, प्रसाद अथानिकर, अतुल नेवासे, राहुल झगडे, निलेश कुलकर्णी, केदार भागवत, योगेश सावंत.
तिकिट विक्री: अमित मनोहर, अतुल नेवसे, जयेश मोहिते, प्रसाद अथणीकर, प्रसन्न माटे, अभि शेंडे, उपेन्द्र वाघ, योगेश सावंत, चंद्रजीत पाटील, अनंत गोखले, समीर बेन्द्रे, रणजीत जोशी, पल्लवी मुंडले, निवेदिता कुलकर्णी.
प्रवेशद्वारावरील तिकिट विक्री: सुनील मुन्डले, अभि शेंडे, बाळकृष्ण कामत.
तिळगुळ बनविला: सोनाली परांजपे, सोनाली पाटील, सोनल परब, तेजस्विनी बुचे, सुनयना मोहिते, गायत्री रामदासी, मेधा मनोहर, मंगल नरसाळे, शुभदा गोखले, गौरी करंदीकर, आदिती साठे, अश्विनी देशपांडे.
हळदीकुंकू, तिळगुळ व वाण वाटप: सोनाली परांजपे, अनुजा दुर्वास, निवेदिता कुलकर्णी, तेजस्विनी बुचे.
सभागृह व्यवस्था: बाळकृष्ण कामत.
छायाचित्रण: मयुरेश देशपांडे. चलचित्रण: समीर दंडगे, समीर बेन्द्रे.

- सोनाली पाटील.

कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००