कार्यक्रम २००६ - संक्रांत


तिळगूळ घ्या गोड बोला...

मकरसंक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. आप्त मित्रांना “तिळगूळ घ्या गोड बोला” असे म्हणून परस्परसंबंध दृढ करण्याचा दिवस. हा सण ब्लूमिंग्टन-नॉर्मल मराठी मडळाने साजरा केला हळदीकुंकु, कला प्रदर्शन, विविध गुण दर्शन, आनंदमेळा आणि सहभोजनाने.

कार्यक्रमात सुरवातीला मेघना पांडे यांनी कथ्थक नृत्यातून श्री गणेशवंदना सादर केली. त्यानंतरचा कार्यक्रम थेट घेउन गेला राजस्थानात! सुप्रसिद्ध गायिका ईला अरुण यांनी गायलेल्या “रेशमका रुमाल लेके...” या गाण्यावर पारंपारिक नृत्य बसविले होते दुलारी ठाकूर आणि राजश्री कुलकर्णी यांनी. त्याना साथ केली होती कांचन बोरगावकर, शुभांगी सराफ, पद्मजा कोडगिरे, वैशाली कचोले, गीता टेके आणि नंदिनी पुसाळकर यांनी. नंतर उपस्थितांची पावले थिरकली ती तरुणाईच्या लाडक्या रिमिक्सच्या तालावर. योगिनी टेणी, श्वेता जामसंडेकर, अनुराधा गोरे, मुक्ता मनोहर, अंअृता सहस्रबुद्धे, प्रिया मुकादम आणि ईशा दंडवते यांनी सतत बारा मिनीटे रिमिक्सची नॉनस्टॉप झलक सादर करून का्र्यक्रमात जान आणली.

यानंतर आनंदमेळ्याला सुरुवात झाली. यात मोठ्यांसाठी ६ व छोट्यांसाठी ३ स्टॉल्स होते. त्याच्या नावात आणि मांडणीतही कल्पकता होती. पत्त्यांच्या दुनियेची ओळख करुन दिली रेवा ठाकूर आणि आरती आयाचित यांनी. सोडा आणि फोडा या खेळात रंगत आणली ती दीपा जोशी आणि सोनाली परांजपे यांनी. मनोरे रचा आणि चायनीज् स्टिक अथवा फोर्कच्या मदतीने “पिक विथ द स्टीक” या खेळाची अनोखी योजना होती गौरी कुलकर्णी, तेजस्विनी बुचे, आणि ज्योती जोशी यांची. एका मिनीटात फुगे फुगवून फोडा असा गमतीशीर खेळ योजला होता अंजना भातखंडे आणि कविता परब यांनी. रिंग टाकून बक्षिस मिळवा हा सगळ्यांच्या आवडीचा खेळ ठेवला होता वैशाली कारुळकर आणि मेघना वझे यांनी.

बच्चे कंपनीसाठीही काही छान खेळांचे आयोजन केले होते. आदिती आणि मानसी साठे यांचे “फेस पेंटींग” मुलांना खुश करुन गेले. इतर छोट्यांचेया खेळांचे आयोजन केले होते गायत्री कारुळकर, शिवानी वझे, निधी कुलकर्णी, एकता परब आणि विराज जोशी या छोट्या दोस्तांनीच.

स्त्रीयाच्या कल्पनाशक्तीतून निर्माण झालेल्या अनेक सुंदर कलाकुसरीच्या गोष्टी बघायला मिळाल्या कला प्रदर्शनात. मीनल शहा यांनी फुलांच्या रचना, तोरण आणि मेणचा केक बनवला होता. सुचेता कोठारे यांनी मण्याची झाडे व फुलांचे. गुच्छ बनवले होते. गीता टेके यांनी सोनेरी मणी, मोती कुंदन आदी वस्तुंपासून दागिने बनवले होते. नदिनी पुसाळकर यांचे लक्ष्मीचे पेंटींग, तेजस्विनी बुचे यांचा टेबलक्लॉथ, सिरॅमिक पेंटी्ग, मेघना पांडे यांची पेन्सिल स्केचेस, हॅंड एम्ब्रॉयडरी, वारली पेंटींग प्रदर्शनाची शान वाढवत होते.

सोनाली परांजपे यांनी स्पंजपासून तयार केलेल्या वस्तू, भाग्यश्री सरदेसाई यांचे क्रॉस स्टीचचे वॉल हॅंगींग, तर कविता परब यांनी बनवलेल्या फुलांच्या आकाराच्या मेणबत्त्या आणि फुले लक्ष वेधून घेत होते. वर्षा पै यांची पेन्सिल स्केचेस, गौरी कुलकर्णी यांचे क्विल्ट व जरदोसी वर्क, ज्योती जोशी यांचे आर्टिफिशियल दागिने प्रदर्शनाची शान वाढवत होते. भावना निर्मल यांनी बनवलेले दागिने, लोकरीच्या पर्सेस, दुलारी ठाकूर यांच्या सिरॅमिकच्या वस्तू, लोकर आणि जर यांनी सजलेल्या वेताच्या टोपल्या, वन् स्ट्रोक पेंटींग आणि आदिती साठे यांची इकेबाना उठून दिसत होती. अनुजा दुर्वास यांची सॅलडस् “सुदृढ आयुष्याकडे वाटचाल” कशी करायची हे सांगत होती. शैलजाताई शिरसाळकर यांनी केलेले फॉल कलर्सचे कोलाज, भरतकाम केलेली साडी, जास्वंदीच्या पाकळ्यांच्या आकारातला गणपती, मातीपासून बनवलेले मॅग्नेटस् आणि अनेकविध प्रकाराची कलाकुसर सगळ्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

अशा या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली सहभोजनाने. अश्विनी देशपांडे आणि गौरी करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

- अमृता सहस्रबुद्धे.

कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००