कार्यक्रम २००४ - संक्रांत

संक्रांत – ब्लूमिंग्टन ज्यु.हायस्कूल मधे ३१ जानेवारीला संक्रांत साजरी झाली सालाबाद प्रमाणेच महिला कलाकारंच्या विविध गुणदर्शनाने. यंदाचा कार्यक्रम गाजवला “महाराष्ट्राची लोकधारा” ने.

महाराष्ट्राची लोकधारा हा मराठी लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम यात सादर झाले... अभंग, गवळण, भारूड, दिंडी, कोळीनृत्य, मंगळागौरीचे खेळ, आदिवासी नृत्य, लावणी असे अनेक प्रकार. संकल्पना होती वंदना कामटेंची. दिग्दर्शन होते वेदवती गोखले यांचे. नृत्य दिग्दर्शन होते मेघना पांडे आणि स्मिता रोंघे यांचे. कलाकार होते वंदना कामटे, वेदवती गोखले, स्मिता रोंगे, प्रतिक्षा शेवडे, कांचन बोरगांवकरा, ज्योती पाटील, अर्चना जोगळेकर, मेघना पांडे, दिप्ती तावरे, सुरभी आगरवाल, ईशा दंडवते, सौ. बुलबुले.

“रंगतरंग सासू सुनांचे “– महिला मंडळा तर्फे “आदर्श सासू सुन” जोडी शोधून त्यांना चांदीची ढाल तलवार द्यायची असे ठरते.. आणिइ मग काय..शोध सुरु होतो…अशा आदर्श जोडीचा. स्पर्धा घेता घेता आपल्या आजूबाजूच्या सासू सुनांच्या स्वभावाचे नमुने यात दाखवले होते. दिग्दर्शन होते गौरी करंदीकर यांचे. भाग घेणारे कलाकार होते…मेघा धर्माधिकारी, मधुरा देसाई, शिल्पा कुरुंदकर, मेघा कोरडे, भावना जोशी, मेधा कदम, सोनल पाटील, सुधा राऊत, वैशाली चावरे, सोनाली डहाळकर, गौरी करंदीकर.

नृत्य,नाटक या नंतर झाला गाण्याचा कार्यक्रम .रागांवर आधारित सात गाणी सादर केली, सप्तरंग या कार्यक्रमात... संकल्पना गौरी सरदेसाई… कलाकार होते... प्राची परांजपे, गौरी सरदेसाई, आरती कुलकर्णी, , रेवा ठाकुर. निवेदन केलं मानसी जोशी यांनी.हार्मोनियम वर होते शैलेश जोशी, तबला प्रसन्न माटे.

संक्रांतीचे हळदी कुंकू, तिळगूळ आणि अल्पोपहार याने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००