कार्यक्रम २००२ - संक्रांत


ट्रायलेक हॉल मधे संक्रातीचा कार्यक्रम उत्साहात झाला. प्रवेशद्वाराशी स्वागताला सुंदर रांगोळी काढली होती. हॉल मधे येताच….हळदी कुंकू, तिळगूळ मिळत होते. या वर्षी सुद्धा करमणुकीच्या कार्य़क्रमात फक्त महिला कलाकारांचा सहभाग होता.

कार्यक्रमाची सुरुवात झाली गाण्यांनी, ”प्रेमभावनेवर” आधारीत गाणी सादर केली… प्राची परांजपे, आरती आठवले, शर्मीला एकबोटे. मृदुला केतकर, मृणाल फणसळकर य़ांनी. निवेदन…. गौरी करंदीकर.

सूर आणि ताल सांभाळला होता सिंथसाइजर वर शैलेश जोशी आणि तबल्यावर चंद्रशेखर वझे यांनी.

या नंतर साजरा झाला ‘चित्रहार’ – सहगल ते सलमान खान या कालखंडातील बदलते संगीत नृत्यप्रकार सादर केले गेले . सर्व गाणी लोकप्रिय असल्याने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हा कार्यक्रम त्यांचाच वाटला . स्टेजवर प्रत्येक नट, नटी जिवंत करण्यात कलाकार यशस्वी झाले. दरवेळी गाण्याचा सेट (झाडे, रेल्वे, घोडागाडी, बॅडमिंग्ट्न कोर्ट) कलाकारांनीच आपल्या कृतीनेच उभा केला ही उल्लेखनीय बाब. यातील कलाकार होते… निवेदिता कुलकर्णी, शिल्पा आडबे, अर्चना जोगळेकर, मृणाल वाईकर, मधुरा देसाई, दीपा जोशी, संध्या शिखरे, गीता कदम, अंजना भातकांडे.

त्यानंतर सादर झाली दीपा जोशी लिखित आणि दिग्दर्शीत “ रेशीमगाठी’ ही नाटिका .या नाटिकेत आजकालच्या वृद्धांचे एकटेपणाचे प्रश्न, त्यांचे पुनर्विवाह या समस्या सादर केल्या होत्या. कलाकार होते दीपा जोशी, अनघा जोशी, मधुरा देसाई आणि शलाका आपटे यांनी.

मंगला गोड्बोले यांच्या कथेवर आधारीत नाटिका सादर झाली. ”बाल्टिमोरची कहाणी“ नाट्यरुपांतर माधुरी माटे. दिग्दर्शन गौरी करंदीकर. अमेरिकेतल्या आपल्या सगळ्यांना थोड्याफार फरकाने अनुभवाला येणारी ही कहाणी.. दूर राहणाऱ्या पालकांना वाटणारे काळजीयुक्त प्रेम आणि डॉलर कमावणाऱ्याबद्दल बद्दल इतरांचा दृष्टीकोन यात चांगला दाखवला होता. अधूनमधून विनोदाची पेरणी करत, शेवटी हे असं का? मीडीयाने केलेल्या अमेरिकेच्या अतीरंजित वर्णनचा तर हा परिणाम नाही नां? असा प्रश्न ही टाकला होता. सापडलयं तुम्हाला उत्तर? कलाकार होते……… प्राची परांजपे, सुधा राउत, वीणा नेरुरकर, माधुरी माटे, भाग्यश्री सरदेसाई, अनघा कर्णिक, गौरी करंदीकर, मेघा कोरडे.

या नंतर दिपनृत्य सादर केले ………. मेधा कदम, आरती आठवले, मृणाल फणसळकर, गीता कदम, शलाका आपटे यांनी, निवेदेता कुलकर्णी, शिल्पा आडबे ..

शेवटी झाला अल्पोपहाराचा खमंग कार्यक्रम.

कार्यक्रम यशस्वी करण्यारे स्वयंसेवक होते मकरंद केतकर, अतुल आठवले, श्रीनिवास शिखरे, राहुल शिन्दे,मिलिन्द चिदंबर, अतुल देसाई, मनोज आपटे.

कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००