संक्रांत – २००१

संक्रांत – ऍश पार्क च्या हॉल मधे संक्रांत उत्साहात साजरी झाली.करमणुकीचे सगळे कार्यक्रम महिलांनी सादर केले हे उल्लेखनीय

या कार्यक्रमात प्रथम वसंत, शिशिर, ग्रीष्म, वर्षा अशा चार ऋतुंवर आधारित गाणी सादर झाली. साथ मोहन भिडे (हार्मोनीअम), चंद्रशेखर वझे, (तबला) आणि गायिका.. गौरी सरदेसाई, मृदुला केतकर, मृणाल फणसळकर, शर्मिला एकबोटे.

नंतर दोन नाट्यप्रवेश सादर झाले पु.ल.देशपांडे लिखित “तुझे आहे तुझपाशी” या नाटकातील एक प्रसंग... यात सहभागी झालेले कलाकार होते दीपा जोशी, लीना ठोंबरे, अनुराधा गोखले, शलाका आपटे, मेधा कदम, दिग्दर्शन गौरी करंदीकर.

दुसरा नाट्यप्रवेश होता गौरी करंदीकर लिखित आणि दिग्दर्शित “माझा विदेशी संसार“. यात सहभागी झालेले कलाकार होते…. दीपा जोशी, प्राजक्ता कमलापूर, शलाका आपटे, अंजली काळे, मृणाल वेलणकर, संध्या शिखरे, ज्योती जोशी.

नंतर तबला, बासरी, ढोलकी, सतार, इत्यदी वाद्यांच्या फ्यूजन म्युझिक वर “भारतीय स्त्री” चे भावविश्व नृत्यातुन सादर करण्यात आले. संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन कविता पंडीत यांचे. कलाकार मनीषा माणगांवकर, मृणाल वेलणकर, सुचेता ईनामदार, शलाका आपटे, प्राजक्ता कमलापूर,आरती आठवले.

यानंतर हळदी कुंकु, तिळगूळ, वाण आणी अल्पोपहार झाला.

कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००