अनुभव वाटू आपुले अनोखे



हे सुंदर दृश्य कुठलं हे कदाचित तुम्हाला ठाऊक असेलच. हे आहे मानवनिर्मित जागतिक आश्चर्यांच्या यादीत नव्याने समाविष्ट केलेल्या "माचू पिचू" चं.

नावाप्रमाणेच याची आखीव रेखीव मांडणी आणि प्रंचड विस्तार याबद्दल आपलं कुतुहल जागे करते. आणि अशा अद्भूतरम्य ठिकाणी जायला काय मजा येईल अशी नैसर्गिक इच्छाही निर्माण करते.

ही आपली इच्छापूर्ती करायला, त्याचबरोबर पेरू देशाच्या भेटीबद्दल दृकश्रव्य (ड्व्ड्-विदेओ) रंजक माहिती द्यायला एक कार्यक्रम मराठी मंडळाने तुमच्यासाठी आयोजित केला आहे.


या कार्यक्रमाचे तपशील खालीलप्रमाणे.

दिनांकः बुधवार, २० फेब्रुवारी २००८
वेळः सायंकाळी ७ ते ९
स्थळः ब्लुमि*ग्टन् पब्लिक लायब्ररी
प्रवेशः विनामूल्य
सादरकर्तेः श्री. समीर आणि सौ. शेतल द*डगे

कार्यक्रमाची रुपरेषा

* ओळख - ५ मिनीटे
* माचू पिचूची सैर - ३० मिनिटे
* पेरू देशातील गमती जमती - ४५ मिनिटे
* गप्पा आणि प्रश्नोत्तरे - १५ मिनिटे
* समारोप - ५ मिनिटे

तळटीपः लायब्ररीचा हॉल ९ वाजायच्या आत रिकामा करायचा असल्याने कार्यक्रम ठीक ७ वाजता चालू होईल, कृपया याची नोंद घ्यावी.

आपले असेच अमुल्य अनुभव एकमेकांबरोबर वाटून, एकमेकांना समृद्ध करावं यासाठी मराठी मंडळ असे अनौपचारिक व्यासपीठ उपलब्ध करून देऊ इच्छिते. आशा आहे की आपण या कार्यक्रमाचा भरपूर लाभ घ्याल आणि याचसारखे आपल्याकडेही काही अनोखे अनुभव असतील तर ते इतरांबरोबर वाटाल.

आगाऊ आरक्षण(RSVP): कृपया आपली उपस्थिती खालीलपैकी एका नंबरवर १८ फेब्रुवारी पर्यन्त कळवावी म्हणजे बैठक व्यवस्थेची सोय करण्यास सोपे जाईल. सौ.शेतल दंडगेः ३०९-८०७-०१७०, मयुरेश देशपांडेः ३०९-८२५-७३१३ अथवा या ईमेलवर कळवाः sampark@bmmandal.org

- आपले ब्लुमिंग्टन् नॉर्मल् मराठी मंडळ


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००