Family Fun Fair

मे महिना सुरु झाला, सगळीकडे आता जरा हिरवळ दिसायला लागली. आता सर्वांना घराबाहेर पडायचे वेध हि लागले. अश्या वातावरणात आपल्या कुटुंबासोबत धमाल जत्रा हवीच. म्हणून तर ४ मे रोजी YWCA च्या हॉल मध्ये मंडळा ने आयोजित केली ब्लूमगावची जत्रा अर्थात Family Fun Fair

केशरी रंगात सर्व कार्यकर्ते अगदी झकपक तयार होऊन आपापल्या खेळांची मांडणी करत होते. एका बाजूला टेबले गेम्स, दुसऱ्या बाजूला फ्लोअर गेम्स आणि मध्ये फूड बॉक्स अशी जागेची व्यवस्था विनोद म्हसे यांनी अगदी नीट केली. मध्ये आपल्या मंडळाचा फ्लेक्स झळकत होताच. कार्यक्रम सुरु करण्याआधी थोडं फोटो शूट हि झालं. नेहमीप्रमाणे सर्वांचाच ओसंडून वाहणारा उत्साह, कार्यकर्त्याची आवराआवर, मुलांचा दंगा अश्या एकुणात चैतन्य संध्येत कार्यक्रम सुरु झाला.

रश्मी गोखले आणि योगेश बेंद्रे यांच्याकडून बाहेरून तिकीट आणि स्टिकर शीट घेऊनच सगळे आत यायला सुरुवात झाली

या फन फेअर च सूत्रसंचालन केलं योगेश बेंद्रे यांनी. त्यांच्या बहारदार कॉमेंटरी ने कार्यक्रमात अजून रंगत आणली. त्यांच्या नजरेतून काहीही सुटत नव्हतं. बटाटे गोळा करताना कोणी तरी केलेली cheating, तीन पायांच्या शर्यतीत पळणाऱ्या जोडप्यांना चिडवणं, गुडघ्यात बॉल घेऊन बदकासारखे चालणाऱ्यांची टर उडवणं याने कार्यक्रम अजून फुलत गेला

गेम मध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला स्टिकर.,ज्याची स्टिकर्स जास्त तो फायनल विजेता. लहान मोठे असा काही भेद नाही. प्रत्येकाची जास्तीत जास्त स्टिकर्स मिळवण्याची धावाधाव. पण त्यातूनही मुद्दामहून हरणाऱ्या आई बाबांना बघून आम्हांला सॉलिड मजा येत होती. काही महारथी तर मुद्दाम लहान मुलांसोबत खेळून स्टिकर्स हि मिळवत होते. पण आमच्या फन फेअर मध्ये सगळं चालतं, शेवटी धमाल महत्वाची !

गेम्स आणि कार्यकर्ते –
1 Plastic Cup Tower ---Anant Gokhale Ananya Rotkar
2 Straw & Peas--- Aparna Idate Shweta Sawant
3 Bottle Ring Toss ----Rujuta Durwas Anish Deshpande
4 Bucket- Coin Toss Anuja Durwas Deepali Deshpande
5 7 Up OR 7 Down Amrita Deodhar Harshal –
6 Potato Race Tarannum Shaikh Apurva Paranjape
7 Lemon & Spoon Rikita Paranjape Aakash Paranjape
8 Mini to Win it Anusha Nadkarni Khushi Gallapali
9 3 Leg Race Anwesh Joshi Anand Jadhav
10 Balloon Game - 1 min game Swetasree Mhase Vinod Mhase
11 HullaHoop - 1 min game Shraddha Joshi Mohit Potnis

रंगलेला खेळ अजून बहारदार झाला तो वल्लरी जोशी, सीमा बेंद्रे, रश्मी जोशी, अस्मिता राऊत, शर्वरी जोशी यांनी केलेल्या झणझणीत वडा पाव आणि चटकदार भेळेनी.Thanks प्रसाद देशपांडे, सुशील दुर्वास for helping them.

चहाबाज लोकांसाठी चहाची सुद्धा सोय होती. चहाची हि 'टपरी' सांभाळली ती सोनाली मोकाशी आणि प्रीती पाटील यांनी. लहान मुलांसाठी juice ची व्यवस्था प्राजक्ता कुलकर्णी यांनी.

कार्यक्रम संपन्न झाला तो बक्षीस समारंभानी सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात आली.

योगेश बेंद्रे यांनी अत्यंत कल्पकतेने केलेली certificates आणि vounteer badges दाद घेऊन गेली निघताना प्रत्येकजण सांगत होता "पुन्हा अशी जत्रा लवकर भरवा " ही प्रतिक्रिया म्हणजे कार्यक्रमाच्या यशाची मोठीच पावती होती !

Thanks Vinay Mokashi for capturing the event with awesome clicks !

पुन्हा एकदा सगळ्या volunteers चे अभिनंदन !

Photo Link FunFair 2019