आषाढी एकादशी

आषाढी एकादशी निमित्त शुक्रवार दिनांक १५ जुलै रोज्री मंदिरात पांडुरंगाची पूजा आणि आरती करण्यात आली. सर्व विट्ठल भक्त उत्साहाने सहभागी झाले.

मंदिराच्या आवारातून पुंडलिक वरदा हरी विट्ठल असा गजर करत, ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम या नामघोषात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामाची पालखी मंदिरात नेली.तिथे विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन केले.

वसुधा भालेराव , प्राची परांजपे , अम्रिता देवधर , नेहा जोशी , अनंत गोखले आणि अवधूत नाडकर्णी यांनी सादर केलेला भक्तीसंगीताचा कार्यक्रम उपस्थितांची दाद घेऊन गेला.

आरती आणि प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालील कार्यकर्त्यांचे सहाय्य लाभले.

खिचडी अस्मिता राऊत , गौरा करंदीकर 
पेढे रश्मी गोखले , गौरी करंदीकर 
पूजा व्यवस्था आणि flavored milk रश्मी गोखले , रुपाली अमराडकर 
ध्वनी व्यवस्था आशिष डहाके  अमोल ठाकूर 
कार्यस्थळ व्यवस्था क्रांतीकुमार राउत , गणेश आणि रेश्मा अनभुले 
फोटो विनय मोकाशी , केदार कुंचूर 
प्रसाद वाटप सुशील दुर्वास , उदय परांजपे , समीर आगरकर , प्रसाद देशपांडे ,योगेश चिंगलवार , सुनंदा काळे.स्मिता कांबळे, 

 

कार्यक्रमाची छायाचित्रे