डॉ.वनिता पटवर्धन यांचे मुले व पालकांसाठीचे शिबीर

शनिवार दिनांक १८ ऑगस्ट २०१२ रोजी ब्लूमिंगटन नॉर्मल मराठी मंडळातर्फे लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेले शिबीर ब्लूमिंगग्रोव्ह् अकॅडमी येथे उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम डॉ.वनिता पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

डॉ.वनिता पटवर्धन, गेली ३५ वर्षे पुण्यातील "ज्ञानप्रबोधिनी" ह्या सुप्रसिद्ध संस्थेत काम करत आहेत. Her fields of specialization are Educational Psychology, Cognitive Psychology, Psycho metrics, Human Resource and Research, also continuing Guidance & Counseling and consultancy.

शिबिराची सुरुवात "डोंगराला आग लागली पळा पळा पळा" हा जुना मजेशीर खेळ जरा वेगळ्या पद्धतीने खेळून करण्यात आली. पळत असताना अशक्य वाटतील अश्या नंबराचे गट बनवण्याला मुलांना सांगण्यात आले . उदा. ४ १/२ , ०, १०० इ. यावर मुलांना उपाय शोधायला सांगून त्यांच्या कल्पकतेला वाव देण्यात आला. "We can copy ourselves four times किंवा 'आपण इथे अदृश्य अशी अजून माणसं आहेत असं मानूया' असे अनेक अनोखे उपाय लहान मुलांकडून ऐकण्यास मिळाले.

पुढचा खेळ होता एका विशिष्ट आकाराच्या रोजच्या जीवनातील माहिती असणाऱ्या वस्तू, गोष्टी सांगणे. वरवर साधा वाटणारा हा खेळ मुलांच्या निरिक्षण शक्तिबाबत बरंच काही सांगून गेला. यानंतर Branches of Word हा खेळ खेळण्यात आला. एका इंग्लिश शब्दातील एकच अक्षर बदलून ५ मिनिटांमध्ये जास्तीत जास्त शब्द बनवण्यास सांगण्यात आले. वेळ संपल्यावर "तुम्ही लिहिलेल्या शब्दामध्ये असा एखादा शब्द जो उपस्थित मुलांमध्ये कोणीच लिहिलेला नसेल असं तुम्हाला वाटतं ते सांगा" असं विचारण्यात आलं. वेगवेगळ्या वयोगटात असणऱ्या १५-२० मुलांतील प्रत्येकाकडे असा एक शब्द नक्की होता. यातच मुलांची 'Word recognition capacity' लक्षात येते. अशाच प्रकारचा एक खेळ संख्यांबाबत खेळण्यात आला. काही मुलांनी शब्दांच्या खेळात बाजी मारली, काहींनी संख्याच्या खेळात, तर काहींनी सर्वच खेळ उत्तमरित्या खेळले. पण शिबिरात हरणे-जिंकणे ह्याला महत्व न देता प्रत्येकाच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. ह्यानंतर अल्पोपहाराची सुट्टी झाली.
अल्पोपहारानंतर 'चकली, लाडू, करंजी' हा मुलांमधील 'Body and Mind Co-ordination'याला चालना देणारा खेळ खेळण्यात आला. नंतर स्वतःच्या नावाची आणि आडनावाची आद्याक्षरं वापरून वेगवेगळ्या प्रकारचे 'लोगो' बनवण्यास सांगण्यात आले. [[ मुलांनी कल्पकता आणि सृजनशीलता स्वतःवर केंद्रीत करावी हा या खेळाचा उद्देश होता ]]

शिबिरात सर्वात शेवटी एक 'Group exercise' घेण्यात आला. ३-४ मुलांचे गट करून प्रत्येक गटाला एक विशिष्ट परिस्थितीत वेगवेगळ्या भावना कश्या मांडता येतील हे नाटकाद्वारे मांडण्यास सांगण्यात आले. ह्या कार्यक्रमातील 'volunteers'च्या मदतीने मुलांनी आनंद, राग, भीती असे अनेक भाव आपआपल्या नाटकांतून इतरांसमोर मांडले. शिबिरात विविध खेळांद्वारे मुलांमधील कल्पकता, सृजनशीलता आणि निरिक्षण शक्तीला प्रोत्साहन देण्यात आले. शिबीराची सांगता मुलांनी आपल्या वनितादीदींचे आभार मानून केली.

शिबिरात मुलांइतक्याच उत्साहाने भाग घेणारे स्वयंसेवक होते : गौरी करंदीकर, निवेदिता कुलकर्णी, अपर्णा इदाते, प्राची पटवर्धन, शिल्पा पतंगे , मोहित पोतनीस , कांचन दामले,

दुपारचे सत्र होते पालकांसाठी... सुजाण पालकत्वासाठी नेमके काय करावे याबद्दल यांनी डॉ.वनिता पटवर्धन मार्गदर्शन केले. पालकांच्या मनातल्या अनेक शंकांचे निरसनही त्यांनी केले.

ब्लूमिंग्टन मराठी मंडळातर्फे गौरी करंदीकर यांनी डॉ.वनिता पटवर्धन यांचे हार्दिक आभार मानले.

वृतांकन - कांचन दामले

कार्यक्रमाची छायाचित्रे