कार्यक्रम - “ती”

रविवार दिनांक १३ जून रोजी ब्लुमिंग्टन् नॉर्मल मराठी मंडळ पुरस्कृत, सिस्टर कन्सर्नस प्रस्तुत मराठी भावमधुर गीतांची नाट्यरूपी गुंफण “ती” हा एक बहारदार कार्यक्रम कार्यक्रम सादर झाला.

चित्रपट अभिनेत्री वंदना गुप्ते आणि गायिका राणी वर्मा यांनी "स्त्री "जीवना्तील प्रवासातले विविध टप्पे खु्सखुशीत निवेदन,अभिनय आणि गाण्यांच्या माध्यमातून सादर केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे स्थानिक कलाकारांचा त्यातला सहभाग.

"तुझी चाल तुरु तुरु..."हे धमाल गीत सादर केले अनंत गोखले यांनी,तर "सोळावं वरीसं धोक्याचं"...हे ठसकेबाज लावणी नृत्य सादर केले श्रेया देसाई यांनी."मामाच्या गांवाला जाउ या..." या बालगीता वर अनुशा नाडकर्णी, ऋजुता दुर्वास,जय महाजन,प्रिया जोशी,अर्जुन गुंडेवार या बालकलाकारांनी धमाल उडवून दिली.

“ती” कार्यक्रमानंतर झाल्या … “वंदनाजीं बरोबर गप्पागोष्टी”. वंदना गुप्तेंची प्रकट मुलाखत घेतली अभिजीत नेरुरकर यांनी …..मुलाखती दरम्यान प्रेक्षकांनी ही वंदनाजींना प्रश्न विचारले ,आणि त्याला समर्पक आणी दिलखुलास उत्तर देत वंदनाजींनी ही मुलाखत अतीशय रंजक केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांचे मोलाचे सहकार्य झाले: वंदना नाईक,गौरी करंदीकर,मोहीत पोतनीस,अभिजीत नेरुरकर,अभि शेंडे, समीर बिल्डिकर, अनिरुद्ध गोडबोले, आणि सचीन बुचे.

कार्यक्रमाची छायाचित्रे

===============================================================

एक बहारदार कार्यक्रम घेऊन १३ जून ला मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री वंदना गुप्ते आणि गायिका राणी वर्मा आपल्या भेटीला येत आहेत....

. ....

ब्लुमिंग्टन् नॉर्मल मराठी मंडळ पुरस्कृत, सिस्टर कन्सर्नस प्रस्तुत मराठी भावमधुर गीतांची नाट्यरूपी गुंफण “ती”

  • रविवार दिनांक १३ जून वेळ दुपारी ४ ते ६
  • केम्प रिसायटल,नॉर्मल (नकाशा) (नकाशा-II)
  • तिकीट दर १० डॉलर ( १२ वर्षांखालील मुलांना प्रवेश मोफत)

तिकीटा साठी संपर्क साधा

  • गौरी करंदीकर (३०९-६६१-१०३४)
  • वंदना नाईक(३०९-८२६-८२६९)
  • अभिजित नेरूरकर (३०९-३६३-९५३८)
  • योगेश सावंत (३०९-५३०-३४१३)
  • अभि शेंडे (३०९-५३३-०९८८)
  • गौतम करंदीकर (३०९-५३२-०७४२)

आपण तिकिट ऑन लाईन ही खरेदी करु शकता

“ती” कार्यक्रमानंतर अल्पोपहाराची व्यवस्था आहे.आणि त्या नंतर आहे … “वंदनाजीं बरोबर गप्पागोष्टी” वंदना गुप्तेंची मुलाखत घेतील अभिजीत नेरुरकर…..मुलाखती दरम्यान आपणही वंदनाजींना प्रश्न विचारु शकता.

१२ वर्षां खालील मुलांना तिकिट नाही ,पण आपले तिकिट घेताना आपल्या सोबत येणा-या मुलांची संख्या आणि वय तिकिट घेताना सांगीतले तर व्यवस्थापना साठी सोयीस्कर होइल.

मंगळवारी RK ग्रोसरी मधे मंडळाच्या लायब्ररीत संध्याकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत तिकीटे मिळतील.

========================================================

  • Date / Time: Sunday - June 13, 2010 ( 4PM to 6PM)
  • Venue: Kemp Recital Hall, Normal IL (Map-I) (Map-II)
  • Tickets: $10 per Adult (Free for Kids under 12)
  • For tickets please contact
    • Gouri Karandikar(661-1034)
    • Vandana Naik (309-826-8269)
    • Abhijeet Nerurkar (309-363-9538)
    • Yogesh Sawant (309-530-3413)
    • Abhi Shende (309-533-0988)
    • Gautam Karandikar (309-532-0742)

========================================================


कार्यक्रमाचे पोस्टर


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००