कार्यक्रम - बोलक्या बाहुल्या

शब्दभ्रमकला अर्थातच बोलक्या बाहुल्या म्हटले की आपल्या सर्वाच्या डोळ्यासमोर पहिले नाव येते ते रामदास पाध्ये

शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी खास दिवाळी निमित्त जागतिक कीर्तीचे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचा “बोलक्या बाहुल्या” हा कार्यक्रम वॉशिंग्टन एलिमेंटरी स्कूल येथे मराठी मंडळातर्फे आयोजीत करण्यात आला.

रामदास, सौ.अपर्णा व सत्यजीत पाध्ये या तिघांनी बहारदार कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना खुष केले. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांना वेळोवेळी मनापासून दाद दिली.

शब्दभ्रमकला ( Ventriloqism.) ही मुळात भारतीय कला आहे, आपल्याकडूनच ती परदेशात गेली. शब्दभ्रमकला सादर करणारी जी काही मोजकी मंडळी भारतात आहेत, त्यात रामदास पाध्ये यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागले. प्रचंड अभ्यास मेहनत आणि अनुभवातून पाध्ये यांनी आज या क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे

रामदास पाध्ये यांना त्यांच्या वडिलांकडून या कलेचा वारसा मिळाला. आता रामदास पाध्ये यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांच्या रूपाने पाध्ये कुटुंबातील तिसरी पिढी ही कला सादर करत आहे.

रामदास पाध्ये यांच्या या दर्जेदार कार्यक्रमाला रसिकांनी दिलेला प्रतिसाद आयोजकांचा उत्साह वाढवणारा होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवेदिता कुलकर्णी, अर्चना नाडकर्णी, गौरी करंदीकर, अनंत गोखले, मोहीत पोतनीस, सचिन बुचे, अभिजीत नेरुरकर, अभी शेंडे यांनी खुप सहकार्य केले.

गौरी करंदीकर

 

कार्यक्रमाची छायाचित्रे