पाडवा 2024

२०२४ हे आपल्या मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष .यंदाचा हा २५ वा गुढीपाडवा ३० मार्च ,२०२४ रोजी Heartland community college च्या ऑडीटोरियम मधे प्रथेप्रमाणे मराठी नाटकाने साजरा झाला. या सोबतच सुंदर कलाप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.

मनोहर काटदरे लिखित गौतम करंदीकर दिग्दर्शीत “गोलमाल” या २ अंकी तुफान विनोदी नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला . कलाकारांच्या ३ महिन्याच्या मेहनतीचे सार्थक झाले . नाटकाचे थोडक्यात कथानक असे… सदानंद झुंझार आणि सौ. सविता झुंझार यांचा गिरगांवात एक ब्लॉक तर बोरिवलीला बंगला.नोकरी साठी सोमवार ते शुक्रवार झुंझार दांपत्य गिरगांवात आणि वीकएंडला बोरिवलीला असे रहात असत…… सज्जन खरे नावाचा तसा सभ्य सुशिक्षित तरुण ,नोकरी आहे पण मुंबईत रहायला जागा नाही.या अडचणीवर चतुराईने तोडगा काढतो.. झुंझारांच्याच दोन्ही घरात आलटून पालटून.. म्हणजे वीकएंडला गिरगांव आणि इतर दिवशी यांच्याच बोरीवली च्या बंगल्यात रहात असे.

बरेच महिने हे बिनबोभाट चालु रहाते पण….एकेदिवशी सविता. त्याच त्या रुटिनचा कंटाळा आला आहे असे सांगुन.. वीकएंडला बोरिवलिला जातच नाही…सदानंद झुंझार एकटेच बोरिवलीला जातात….गिरगांवच्या घरात नेहमी प्रमाणे सज्जन खरे येतो .प्रथम तो चोर असावा असे वाटून सविता घाबरते…….पण खरंतर घाबरगुंडी उडालेली असते सज्जन खरेची….कारण नेमकं त्याच दिवशी त्याने त्याच्या प्रेयसीला घरी बोलावलेले असते… सौ.झुंझार ना सगळी कल्पना देउन विनंती करुन ते घर सज्जनचच आहे असे आजच्या पुरते नाटक करायला कसतरी तयार करतो.. प्रेयसी मधु येते ..ते घर सज्जनचे आहे या समजुतीत खुष असते…… मधुचे वडील काही कारणाने त्याच भागात आलेले असतात ..ते मधुला या इमारतीत शिरताना पहातात आणि ती इकडे कशी हे पहायला ते ही घरात येतात….त्यांना पाहुन मधु स्वयंपाकघरात लपते….सविता आणि सज्जन खरे हे आपण पतिपत्नी असुन हे घर त्यांच आहे असे मधुच्या वडीलांना सांगुन त्यांना इथून घालवायला बघतात…..या प्लॅन मधे ते यशस्वी होतच असतात ..तेवढ्यात सदानंद चा बॉस काही कारणाने घरी येतो…पाठोपाठ स्वत: सदानंद येतो…. सविताची मैत्रीण मृदुला कोकिळकंठी येते….आणि गोंधळ वाढतच जातो…..हे एवढ कमी म्हणुन की काय त्या भागातला सॅनीटरी इन्स्पेक्टर येतो त्याला पोलिस इन्स्पेक्टर समजुन सगळे गोंधळात आणखी भर घालतात… शेवटी खरा पोलीस हवालदार येतो आणि गोंधळ मिटतो…….…मधु आणि सज्जनच्या प्रेमविवाहाला वडील अनुमती देउन शेवट गोड करतात.सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम कामे करून देखणा प्रयोग सादर केला.

हा गोलमाल करणारे कलाकार होते….

सविता झुंझार - वल्लरी जोशी सदानंद झुंझार - मंदार कुलकर्णी सज्जन खरे - पराग काजरोळकर विद्यार्थी - राजस पाटील, मिहिर कुलकर्णी मधु - रिकिता परांजपे मधुचे वडील - संदीप कोद्रे बॉस - गणेश अनभुले मृदुला कोकिळकंठी - गौरी करंदीकर सॅनिटरी इन्स्पेक्टर- सुशील दुर्वास हवालदार - अक्षय साटम नेपथ्य - प्रवीण फेंगडे, मयुरेश कुलकर्णी, अन्वेश जोशी, विशेष सहाय्य - अनुजा दुर्वास ,अमोल मुजुमले, श्रध्दा माने

या नाटकाचा दुसरा प्रयोग १३ एप्रील रोजी पिओरिया येथे झाला

कार्यक्रमाची छायाचित्रे(Natak Photos)


आपले
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल      



कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२४ २०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००