पाडवा

नमस्कार

एप्रिल १० रोजी One Normal Plaza येथे मंडळाचा गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

१५ वर्षा नंतर प्रथमच यंदा गुढीपाडव्याला ३ अंकी नाटक नव्हते पण विनोदी स्कीटस् सुरेल गाणी, धमाल नृत्ये, सुंदर कलाप्रदर्शन आणि Flash Mob चा सुखद धक्का याने कार्यक्रम खूपच रंगतदार झाला.

कलाप्रदर्शनात वंदना बाजीकर(फोटो), शर्मिला शहा (शोभेच्या वस्तू ), इंद्राणी कुंचूर (विविध कलाकृती ), आकाश परांजपे (स्केचेस ) अस्मिता राउत आणि रुपाली राठोड ( सलाड डेकोरेशन ) असा सहभाग होता.बच्चे कंपनीने सुद्धा आपली कमाल दाखवली.

तन्वी शेगावकर (पेंटींग्स) वेद लोंबर च्या लेगो च्या विविध वस्तू, कुश राउत, स्निग्धा गरूड, अन्वी क्षीरसागर,श्रेया मोकाशी यांच्या सुंदर कलाकृती ने सगळ्यांचीच शाबासकी मिळवली.

ठीक चार वाजता पन्ह्याचा आणि कलाप्रदर्शनाचा आस्वाद घेत कार्यक्रम सुरू झाला.गौरी करंदीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि शशी काचळे यांच्या कडे कार्यक्रमाची सूत्रे दिली,

स्टेजवरच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली धमाल स्कीटस् ने....

घरात चोरी करायला आलेल्या चोराचा मोरू करून चोरालाच पळती भुई थोडी करणा-या खमंग म्हाता-याच्या भूमिकेत होते गणेश अनभुले आणि बिचारा चोर होता अनिरुद्ध गोडबोले.

त्यानंतर वसुधा भालेराव ने एकत्र आणि विभक्त कुटुंब पद्धतीचे फायदे तोटे सांगणारी एकपात्री नाट्यछटा सादर केली.

अनिरुध्द गोडबोले आणि गणेश अनभुले ही जोडगोळी डॉक्टर बनून पुन्हा स्टेजवर अवतरली. डॉक्टरांच्या या जोडगोळीने मस्त धमाल उडवून दिली.

यानंतर सुरु झाला गाण्याचा कार्यक्रम. सीमा बेंद्रे, नेहा चौक, अवधूत नाडकर्णी आणि विक्रम चिमोटे यांनी एकापेक्षा एक अप्रतीम गाणी सादर करून श्रोत्यांची जोरदार दाद मिळवली. karaoke tracks वाजवण्याची जबाबदारी सांभाळली होती योगेश बेंद्रे यांनी.

एका जोषपूर्ण गाण्याने या सत्राचा समारोप झाला. ग.दि.माडगूळकर लिखित मराठा लाईट इन्फन्ट्री चे स्फुर्ती गीत "मर्द आम्ही मराठे खरे" सादरकर्ते  मंदार कुलकर्णी, अनंत गोखले, विनोद म्हसे, आशिष डहाके, अवधूत नाडकर्णी, विक्रम चिमोटे,गणेश अनभुले, गाण्याला ढोलाची दमदार साथ दिली गणेश भदाणे यांनी.

कार्यक्रमाचा शेवट झाला धमाकेदार नृत्याविष्काराने.. नीलम चिमोटे यांनी choreography केलेला "बाजीराव मस्तानी" मधला पिंगा दिमाखात सादर झाला. कलाकार होते नीलम चिमोटे, प्रियांका मानेकर, दिव्या पाटील आणि ओवी सुंभाते.

त्यांनतर Bolywood fusion घेऊन आले अक्षय साटम, आकाश परांजपे, स्वाती गुप्ता, प्रिया होशिंग. Choreography अक्षय साटम आणि प्रिया होशिंग,विशेष सहाय्य अमोल होशिंग.

शशी काचळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाचा समारोप आणि स्वयंसेवकांचे आभार मानणे सुरू असतानाच अचानक एका कोप-यातून प्रणाली पारसनीस आणि मैत्रीणीनी flash mob सुरू केला आणि सगळ्यांनाच सुखद धक्का बसला. अतिशय सुंदर अश्या flash mob मध्ये सहभागी होत्या प्रणाली चौगुले-पारसनीस, रश्मी जोशी,रश्मी पितळे, अम्रिता देवधर-जोशी, अनुराधा पानस्कर, श्रुती जैन, श्रुती डहाके, रेश्मा अनभुले, मुदिता दवे, अपर्णा इदाते, लिडिया शेगांवकर, रेखा गायकवाड. विशेष सहाय्य मेधा राजगुरू.

खमंग वडापावाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली

कार्यक्रम यशस्वी होण्या साठी नेहमीप्रमाणेच आपल्या स्वयंसेवकानी खूप आपुलकीने सर्व व्यवस्था चोख सांभाळली..!

कार्यक्रमाचे फोटो केदार कुंचूर 
कलाप्रदर्शन रश्मी गोखले,इंद्राणी कुंचूर, स्नेहल तिवाटणे, सुजीत वेळापुरे 
कार्यस्थळ व्यवस्था गौरी करंदीकर, प्रसाद देशपांडे, समीर आगरकर, योगेश चिंगलवार, गणेश भदाणे, आशिष डहाके,अनंत गोखले 
तिकीट विक्री गौतम करंदीकर, उदय परांजपे, 

कार्यक्रमाची छायाचित्रे

व्हीडीओ गॅलरी

धन्यवाद!

आपले
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल      
कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००