कार्यक्रम २००९ - पाडवा

पाडवा २००९

“खोटे बाई आता जा….!”

ब्लूमिंग्टन मराठी मंडळाचा पाडव्याचा कार्यक्रम आणि ३ अंकी मराठी नाटक हे ठरलेले समीकरण…! यंदा शाम फडके लिखित, आणि गौतम करंदीकर दिग्दर्शित “खोटे बाई आता जा….!” हे नाटक दिनांक २५ एप्रिल २००९ रोजी ब्लूमिंग्टन हायस्कूल येथे सादर करण्यात आले.

प्रथम कार्यक्रम व्यवस्थापक सुदर्शन पलांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गौतम करंदीकर यांनी मंड्ळाच्या नव्याने सुरु झालेल्या संन्मित्र ग्रंथालया संदर्भात माहीती दिली. उदय देउस्कर यांनी गांवात होत असलेल्या देऊळा विषयी माहीती दिली, व मराठी भाषिकांना मदतीचे आवाहन केले, त्या नंतर नाटकाला सुरुवात झाली.

नाटकाचे थोडक्यात कथानक असे…
कॉम्प्युटर व्यवसायातील उद्योजक नानासाहेब काळे..यांची थोरली मुलगी नीशा हिचे लग्न उद्योजक बापुसाहेब काळे यांचा मुलगा सुरेश याच्याशी ठरलेलं असतं…दोन्ही घरात लग्नाची तयारी जोरात चाललेली असते………आणि अचानक एके दिवशी “खोटे” नावाच्या बाई कोणतीई ओळख नसताना नानासाहेबांच्या घरी येउन धडकतात….आणि आपल्याला वारंवार पडत असलेल्या स्वप्नांचा दाखला देउन निशा चे सुरेशशी लग्न होणार नाही असे सांगुन बॉम्बच टाकतात…! एरवी कुणी या खोटेबाईंवर विश्वास ठेवलाच नसता पण आपल्या स्वप्नावरुन घरातील बारिक सारीक गोष्टी इतक्या अचुक पणे सांगतात की नाटकातील पात्रांसह प्रेक्षक ही संभ्रमात पडतात …पुढे पुढे तर खोटेबाईंनी स्वप्नात पाहिलेल्या सर्व घटना जशाच्या तशा घडायला लागतात आणि त्याने प्रेक्षकांसह सर्वजण पार चक्रावून जातात… खोटेबाईंच्या प्रत्येक एन्ट्री बरोबर नाटकातले गूढ वाढत जाते पण टिपीकल सस्पेन्स नाटकासारखा तणाव मात्र निर्माण होत नाही याचे मुख्य कारण म्हणजे नाटकात असलेले गंमतीदार प्रसंग. हे प्रसंग दिग्दर्शकाने इतके सुंदर खुलवले आहेत की नाटक एकदम हलके फुलके विनोदी नाटक होऊन जाते. खोटेबाईंनी ममींचा २२ वर्ष जपून वापरलेला टी सेट फुट्णार हे भविष्य वर्तवल्यावर तो फुटु नये म्हणून सगळ्यांनी केलेला सामुहीक प्रयत्न फारच सुंदर………!असे मजेदार प्रसंग , प्रासंगीक विनोद, आणि खोटेबाईंबद्दल वाढत जाणारी उत्सुकता याने नाटक प्रेक्षकांचे पुरेपुर मनोरंजन करते.

या वर्षीच्या नाटकाचे एक वैशिष्ठ्य म्हण्जे गौतम करंदीकरांची भुमिका…..दिग्दर्शक म्हणुन प्रसिध्द असलेले गौतम करंदीकर या वर्षी प्रथमच अभिनेता म्हणुन प्रेक्षकांसमोर आले….प्रत्येक दिग्दर्शक हा प्रथम उत्तम अभिनेता असतो…..हे क्ररंदीकरानी जणू सप्रमाण सिध्द करुन दाखवले….उद्योजक नानासाहेब गोरे, निशा, इशा, कुमार या तीन अपत्यांचा पिता..चिड्खोर पती…हे भुमिकेतील विविध रंग त्यांनी सहजतेने सादर केले. खोटेबाईंच्या मध्यवर्ती भुमिकेत अर्थात होत्या त्यांच्या कसदार अभिनयासह गौरी करंदीकर. खोटेबाईंच्या भुमिकेतलं गुढत्व….त्यांनी अप्रतीमरित्या सादर केल नीशाच्या भुमिकेतील प्रीती पाटील यांचा अभिनय भुमिकेला साजेसा. भावंडांची “ताई” असल्याने भुमिकेतील मॅच्य्ररीटी त्यांनी छान दाखवली. नीशाची दोन भावंडे इशा आणि कुमार या भुमिका अनुक्रमे मंजिरी भागवत आणि अनिरुद्ध गोडबोले यांनी अतिशय परिणामकारक साकार केल्या,दोन्ही कलाकारांना जबरदस्त टाईम सेन्स आहे…अचूक संवाद फेकीने अनेकदा प्रेक्षकांची दाद मिळ्वली. पप्पांकडून चहाची कपबशी पडत असताना अनिरुद्ध्ने त्याचा घेतलेला “झेल” अप्रतिम मम्मींच्या भुमिकेत प्राची परांजपे अगदी ठसक्यात वावरतात आणि त्या मुळे लक्षात रहातात. बापुसाहेब गोरे यांच्या भुमिकेत होते हेमंता पाटील . उद्योजक आणि वरपिता असल्याने भुमिकेतला अपेक्षित रुबाब त्यांनी छान रंगवला आहे. सिध्दार्थ भट्टाचार्य यांनी आपल्या अभिनयाने नाटकातील सुरेशच्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. कौतुकाची बाब म्हणजे अमरअठी भाषिक असुनही त्यांनी केलेली सफाईदार संवादफेक .. त्यांची मातृभाषा मराठी नसून बंगाली असल्याचे जराही जाणवले नाही हे विशेष. शेवटच्या अंकात नाट्यमयरित्या प्रवेश होतो मोहन चा..मोहनच्या छोट्याशा पण मह्त्वपूर्ण भुमिकेला जीवन कुलकर्णी यांनी योग्य न्याय दिला.

दिग्दर्शक गौतम करंदीकर
नेपथ्य अश्विन आगरवाल
पार्श्वसंगीत केदार भागवत
ध्वनी संकलन मोहित पोतनीस
नाटक पोस्टर आदिती साठे
विशेष सहाय्य मंदार कुलकर्णी, रोमेल पारसनीस, सुनिल मुंडले
फोटोग्राफी वैभव शिरोडकर
व्हिडीयो चित्रण अनंत गोखले,अनुप तपकिर, राहुल झगडे
बेबी सीटींग व्यवस्था अर्चना नाडकर्णी, तेजस्विनी बुचे, मीनल लिमये, अजिता खांडेकर, वर्षा धुमाळ ,मुक्ता कुलकर्णी,प्राची पाटील
गुढी उभारली अनुजा दुर्वास
अल्पोपहाराची व्यवस्था सचिन बुचे, मंदार कुलकर्णी, प्रसाद अथणीकर, रोमेल पारसनीस, उदय परांजपे, योगेश सावंत, विशाल पाटील, सुदर्शन पलांडे
तिकीटविक्री पंकज शाह, उदय परांजपे, प्रसाद अथणीकर, लक्ष्मण चौधरी, युवराज सोनावणे, सुनील मुंडले, श्रीनिवास साठे, मंदार कुलकर्णी, नितिन महाजन, 
तिकीटविक्री अभिजित नेरुरकर, योगेश सावंत, मानसी राक्षे, चंद्रजीत पाटील, शिवप्रसाद केसरे, कुणाल लाड, पल्लवी मुंडले,  निवेदिता कुलकर्णी 

- आश्लेषा राऊत.

नाटकाचे पोस्टर      नाटकाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००