कार्यक्रम २००१ - पाडवा


“स्वरसंध्या” या गाण्याच्या कार्यक्रमाने गुढीपाडवा साजरा झाला.

श्री.अतुल आठवले यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देउन उपस्थितांचे स्वागत केले.

स्वरसंध्येची सुरुवात झाली “गगन सदन तेजोमय “ या समूहगीताने …त्यानंतर एकापेक्षा एक अशी दर्जेदार गाणी सादर झाली ती अशी.

मृदुला केतकर चांदणे शिंपीत जाशी……
शैलेश जोशी डोल डोलतय वार,यावर….  आणि वेडात मराठे वीर दौडले सात……
मनोज आपटे मनाच्या धुंदीत लहरीत येना..
राहूल शिंदे डौल मोराच्या मानचा………….
पौर्णिमा सदुंबरेकर  शारद सुंदर चंदेरी राती……..
आरती आठवले जांभुळ पिकल्या झाडाखाली………..
मृणाल फणसळकर रुपेरी वाळूत माडांच्या बनात…………
गौरी सरदेसाई ऐरणीच्या देवा तुला………..…
कविता पंडीत मी कात टाकली…..
चंद्र्शेखर वझे ती येते आणीकं  जाते….

शिवाय मोहन भिडे यांचे सोलो पेटीवादन…… ”झाले युवती मना…..” हे नाट्यसंगीत त्यांनी सादर केले.

कार्यक्रमाची सांगता झाली “उष:काल होता होता….” या समुहगीताने.

”स्वरसंध्या” या गाण्यांच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक होते शैलेश जोशी. हार्मोनीअम साथ मोहन भिडे, तबला चंद्र्शेखर वझे, तालवाद्य गणेश ओक.

या बहारदार संगीतसभेचे ओघवत्या शैलीत निवेदन केले नचिकेत सरदेसाई आणि गौरी करंदीकर यांनी.

“स्वरसंध्या” हा नामफलक आणि गुढी तयार केली राहुल शिंदे यांनी.

मेधा कदम यांच्या मार्गदर्शाखाली मराठी भगिनींनी केलेला जेवणाचा पुरणपोळ्याचा बेत हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांनी मोलाचे सहकार्य केले…… गिरिश कदम, विनोद ठाकूर, अतुल आठवले, मकरंद केतकर, श्रीनिवास शिखरे, मेधा कदम, अतुल देसाई.

कार्यक्रमाची छायाचित्रे