कार्यक्रम २०२३

 

गणेशोत्सव 2023

गणाधिशा भालचंद्रा गजवक्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया!

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ज्या बाप्पाची आतुरतेने वाट पहात असतात त्या गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच ब्लुमगावातील मराठी मंडळात उत्साहाचं वातावरण पसरलं. आणि ब्लूमिंगटन-नॉर्मल मराठी मंडळाच्या गणेशोत्सवाची घोषणा झाली.

23 सप्टेंबर 2023 रोजी हार्टलँड कम्युनिटी कॉलेज च्या ऑडिटोरियममध्ये सनईचे मंजुळ सुर वाजू लागले. आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे आगमन झाले. ह्यावर्षी बाप्पाच्या पूजेचा मान  नवविवाहित जोडप श्री व सौ मोनिका आणि अभिजीत घाटे  यांना मिळाला. आणि सामूहिक आरत्यांच्या गजरात संपूर्ण सभागृह मंगलमय होऊन गेले.नटून थटून आलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावरची भक्ती आणि आनंद ओसंडून वाहत होता.

आता तो क्षण आला पडदा उघडला व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पंधरा वर्षांच्या दोन शाळकरी मुली धृती जोशी आणि अनन्या जोशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. शुद्ध आणि स्पष्ट मराठीत बोलून ह्या मुलींनी जी काय बाजी मारली त्याला तोड नाही. मध्यंतरानंतर मात्र शर्वरी जोशी आणि वल्लरी जोशी यांनी निवेदनाची धुरा उचलली. यावर्षीच्या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आठ महिन्यांपासून ते अगदी पन्नाशी पर्यंतच्या कलाकारांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

छोटी छोटी बाळं आणि त्यांच्या आयांनी मिळून कार्यक्रमाची अतिशय गोड सुरुवात करून दिली आणि मग सोलो परफॉर्मन्सेसना सुरुवात झाली. गाणं,नाच,स्तोत्र,एकपात्री कशातही आम्ही कमी नाही हे गावातील मुलांनी दाखवून दिलं. त्यानंतर ग्रुप डान्सवाल्यांनी देखील एक से बढकर एक असे नाच सादर केले. आता लहान मुलांचे कार्यक्रम संपताच बॅक स्टेज वरती मोठ्यांची धावपळ सुरू झाली. मोठ्यांची बात काही औरच, एकही परफॉर्मन्स असा झाला नाही की ज्याला वन्समोर मिळाला नाही. तरीही ह्या सगळ्यांमध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम आपली विशेष छाप सोडून गेला.जिथे सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात झाली होती तिथे शेवट विठ्ठलाच्या गजरात करून पुन्हा एकदा सभागृह मंगलमय झालं आणि मराठी माणसाचा कार्यक्रम सुरू असल्याचं दिसून आलं.

 

यावर्षी पहिल्या कार्यक्रमापासून ते शेवटच्या कार्यक्रमापर्यंत एक गोष्ट वाखाणण्यासारखी होती ती म्हणजे कॉस्च्युम. प्रत्येक कलाकाराने आणि ग्रुपने कॉस्च्युम वरती विशेष भर दिल्याचे दिसून येत होते. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताच आपल्या हक्काच्या शिवशार्दुल ढोल-ताशा पथकाच्या ताशाची तर्री वाजली आणि ढोलावर ठोका पडला व   संपूर्ण सभागृह दणाणून गेलं. लेझीम पथकाने साथ देऊन ढोल ताशाची रंगत अजून वाढवली.

ढोल ताशावर बेधुंद नाचत कार्यक्रमाचे गोडवे गात आता सर्वांची पावले वळली रुचकर भोजनाकडे, जे की आपल्या स्वयंसेवकांनी बॉक्स मध्ये भरून तयारच ठेवले होते. आता सभागृह रिकामे झाले होते पण मनं  मात्र आनंदाने भरली होती. चेहऱ्यावरचा आणि मनातला हा आनंद जपण्यासाठी आपले कष्टाळू स्वयंसेवक होतेच. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद! असा हा आपल्या मराठी मंडळाचा गणेशोत्सव म्हणजे संस्कृती आणि कलाकृती यांचा सुरेख संगम आहे. गेली 24 वर्ष मंडळ मराठी संस्कृती जपण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे.

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

लहान मुलांचे कार्यक्रम

SOLO PERFORMANCE

कलाकार

वयोगट

कलाप्रकार

अनय मांजरेकर

6

गाणे (सकल गणांचा तू अधिनायक)

शरयू पवार

6

गणपती स्तोत्र

पर्णिका रघुवंशी, अद्विका रघुवंशी

7,10

गाणे, पियानो (कौन केहता हैं भगवान आते नाही)

शनाया पाटील

8

नृत्य

नायशा बिरकोडी

8

एकपात्री ( मी जिजाऊ बोलतेय)

अनघा जाधव

12

भरतनाट्यम

आरायना भिसे

12

कथक

GROUP DANCE

कलाकार

वयोगट

नृत्य दिग्दर्शन

आयोजक

रेश्मा आणि आदित्य अनुभूले, तन्वी आणि वीर डोळ, कल्पना आणि अव्युक्त बिरकोडी

0 ते 1 आणि आई

 

 

नेहा मनुजा-मिराया मनुजा, खुशबू गलानी-रिवा सिंग, वाणी कुलकर्णी-मनस्वी कुलकर्णी, आरती मौर्या-मिवान वर्मा, कल्याणी गलपल्ली-नैतिक गलपल्ली

1 वर्ष आणि आई

 

 

अबीर सुंभाटे,अगसत्य पवार, ऋत्विज साटम, अद्वया  चिंगलवार, मिहिका मांजरेकर, सिया चौहान, सलोनी महेश्वरी

3 ते 5

ओवी सुंभाटे

ओवी सुंभाटे

रियान पितळे, श्रीनय डहाके, आरुष वर्मा, आरव कुलकर्णी, रणजीत पीट्टी, ईशान थोरवे, आहान सिंग, मीरा अनुभूले

5 ते 6

श्रुती डहाके

श्रुती डहाके

पर्णिका रघुवंशी, ग्रीषा भदाणे, रुही श्रीवास्तव, प्रीषा  गाला, चार्वी कोंकटी, दिविषा मलानी, मिष्का मनुजा, मायरा पंडित, सिओना आस्थाना, इयाना साहू, मायरा मेहरोत्रा

6 ते 7

अमिता रघुवंशी

अमिता रघुवंशी

किआन निरगुडे, मिस्त्री शाह, एशानी सिंग, दर्श फेंगडे, अव्यान चव्हाण, ध्रुवा जबदे, अनिष्क देवांगण, अक्षज वर्मा, अद्वेष चिंगलवार, सायशा धोरजीआ, रिया जगानी, आर्या मेहता, अनय मांजरेकर, कायरा नाईक, रिया कॉन्ट्रॅक्टर

7

शानू त्यागी

तेजस्विनी निरगुडे

रिधान शिंदे, आरुष काजरोळकर, ऋषी काळे, हर्ष काळे, शर्मन गोखले

8 ते 10

प्रतिक उमाटे

सरिता शिंदे

अनय डहाके, विआन डोळ, अर्णव चौक, अद्वय आगरकर, रिआन चौहान, स्वनिक गलपल्ली, अद्विक सिंग, शर्विल किर्दन्त

8 ते 10

तन्वी डोळ

शर्मिला आगरकर

अद्विका रघुवंशी, शनाया पाटील, मायरा वर्मा, कायरा मेहरा, ओवी पाटील, पहाल शेठ, शनाया वर्मा, विधी डांगर, अद्विका खरे, साई मनुश्री पेरूमंडाला

8 ते 10

अमिता रघुवंशी

अमिता रघुवंशी

अन्वी जोशी, आरना नाईक, अन्वी रोटकर, क्रिशा पाटील, ऊर्जा हिंदुराव, सेजल माहेश्वरी, शर्वरी किर्दन्त, सोमील मेहता, रयांश पिट्टी, आलिया मोहपात्रा

10 ते 12

शानू त्यागी

प्राची पाटील

हासिनी रेड्डी मोगुल्ला, श्रीभवी कोमलपट्टी, दिया साग्गू, साक्षी किशोर, अभिष्टा बोडापती, पुर्विका बालिवाडा, जासरिथा साई कांचरला, पार्वथी साजिथ

 

दुलारी

दुलारी

आद्या गासिरेड्डी, प्रकल्या क्रिषणा यार्रलागड्डा, सुमेधा यार्रलागड्डा, अनुषा राजन, शिवा अय्यर, नायशा बिरकोडी

 

दुलारी

दुलारी

मोठ्यांचे कार्यक्रम

SOLO PERFORMANCE

कलाकार

कलाप्रकार

मयुरी कुलकर्णी

गाणे (ऐका दाजीबा)

नेहा चौक

गाणे (चला जेजुरीला जाऊ )

GROUP DANCE

कलाकार

नृत्य दिग्दर्शन

आयोजक

दिपाली जबदे, प्रियांका चिंगलवार, रिचा डांगी, तृप्ती डंगर, मोनिका इंगळे, ओवी सुंभाटे, पल्लवी पटेल, रिकीता परांजपे

रिकीता परांजपे

रिकीता परांजपे

तन्वी डोळ, शर्मिला आगरकर, श्रुती डहाके, रेश्मा अनुभूले, आरती फेंगडे, कल्पना बिरकोडी, अमृता श्रीवास्तव

तन्वी डोळ

तन्वी डोळ

कुलदीप शर्मा, अक्षय साटम, दिपक माहेश्वरी

 

 

रिकीता परांजपे, रिना देवांगण, नेहा मनुजा, सरिता देसले, अमिता रघुवंशी, प्रगती ठाकूर, प्रियांका कुलकर्णी, मयुरी कुलकर्णी

रिकीता परांजपे

रिकीता परांजपे

ढोल ताशा पथक

ताशा
गणेश भदाणे, विशाल कुलकर्णी
ढोल
वंदना बाजीकर, मिलिंद मांजरेकर,  श्वेता सावंत,  प्रविण फेंगडे
झान्ज
नेहा चौक, लीना भिसे

लेझीम पथक

आरती फेंगडे, शर्मिला आगरकर, अमिता रघुवंशी,  रेश्मा अनुभूले, मोनिका घाटे, श्रुती डहाके, प्रियांका चिंगलवार, रिकीता परांजपे, तन्वी डोळ, विभूती पटेल, पल्लवी पटेल, रिचा डांगी, सुश्मिता पाटील, रश्मी पितळे

स्वयंसेवक

कार्यस्थळ व्यवस्था

गौरी करंदीकर, रश्मी गोखले, प्रविण फेंगडे, संतोष हिंदुराव, आनंद जोशी, संजय जबदे, आनंद जाधव, सचिन किर्दन्त, मयुरेश कुलकर्णी, रेखा लोंढे, अनन्या रोटकर, चिन्मय कोळगावकर, शर्मिला आगरकर, अक्षय साटम, आनंद रोटकर

तिकीटविक्री

गौतम करंदीकर, अपूर्व परांजपे

ध्वनीसंयोजन

आशिष डहाके

फोटोग्राफी

निलेश निरगुडे

विडिओ रेकॉर्डिंग

पूजा साटम

सजावट

अनुजा दुर्वास, गणेश भदाणे

सूत्रसंचालन

अनन्या जोशी, ध्रुती जोशी, वल्लरी जोशी, शर्वरी जोशी

सर्टिफिकेट

केदार कुंचूर

भोजन व्यवस्था

सुशील दुर्वास, अन्वेश जोशी, रोहित काळे, केदार कुलकर्णी, मिलिंद मांजरेकर, समीर आगरकर, सुरेंद्र आगरकर काका, सुनंदा काळे, शानू त्यागी

मोदक प्रसाद

गौरी करंदीकर, रश्मी गोखले, शर्वरी जोशी, प्रीती पाटील, आरती फेंगडे, सुनंदा काळे, वल्लरी जोशी

उपहार

मध्यंतर अल्पोपहार

पिझ्झा, फ्रूटी

डिनर बॉक्स मेन्यू

छोले, बटाटा भाजी(मुलांना), पुरी, पुलाव, जिलेबी

 

वृत्तांकन

वल्लरी जोशी

 

धन्यवाद,

आपले स्नेहांकित

मराठी मंडळ ब्लूमिंगटन-नॉर्मल




गणेशोत्सव 2023 Report in pdf

Photos

Videos





कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००