गणेशोत्सव

गणपती बाप्पा मोरया...!

१० सप्टेंबर रोजी Capen Auditorium मध्ये मंडळाचा १७ वा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला.  सनई च्या सुरात आणि मोरयाच्या जयघोषात श्रींचे आगमन झाले.  श्री. तरुण झा आणि सौ. स्नेहा अभ्यंकर- झा यांनी श्रींची स्थापना आणि पूजा केली गणेशपूजना नंतर करमणूकीच्या कार्यक्रमाची सुरुवात गणेशस्तोत्राने झाली.  

प्रतीक कट्टी, श्रेया मोकाशी, मिहीर बेंद्रे,  धृव दळवी, अवनी दळवी,  श्लोक किणीकर,  ध्रुव जोशी,  धृती जोशी,  अन्वय जोशी,  अनिश देशपांडे, स्निग्धा गरुड,  मिंजल बाहेती या मुलांनी हे स्तोत्र सादर केले.  मार्गदर्शन होते प्राजक्ता कट्टी यांचे.  

यानंतर एक गोंडस ग्रूप शका लका बूम बूम हा डान्स घेऊन आला त्यात होते अर्ना नाईक,  रेयांश म्हसे, आरुष काजरोळकर, अनय डहाके, ध्रुव कट्टी, अमोघ भालेराव,  नायीशा बिरकोडी, अद्विका रघुवंशी, अर्णव चौक, अद्वय आगरकर, शर्विल किर्दंट,  आर्येश जाड,  हा सुंदर नाच बसवला होता स्वेताश्री म्हसे यांनी.  

यानंतर अवनी बेंद्रे,  अर्णव आंब्रे,  जिया बोरगांवकर,  श्रावणी खक्कर, सोहं जगदाळे,  या खास शॅम्पेन मधून आलेल्या मुलांनी श्लोक आणि स्तोत्रे सादर केली भारतातून आपली मुलगी अवंती भागवत कडे आलेल्या नंदिनी भागवत यांनी ही स्तोत्र मुलांना शिकवली आणि मुलांनी ती अत्यंत अस्खलितपणे सादर केली.

पुढचा कार्यक्रम होता रमा माधव या चित्रपटातल्या हमामा रे पोरा या गाण्यावर धमाल डान्स.  अवनी दळवी,  अबीर पारसनीस,  विहा बापट, शर्मन गोखले, हरिणी मनिकंदन, वैष्णवी तिवारी,  आभास दुरुगकर या मुलांच्या या नाचाने कार्यक्रम आणखी रंगतदार केला नृत्यदिग्दर्शन केले होते.

प्रणाली पारसनीस यांनी यानंतर गार्गी राऊत,  आर्या काचळे,  शर्वरी किर्दंट,  अनघा जाधव,  प्रचिती कुलकर्णी,  आर्या खोत,  आलिया मोहपात्रा,  नमिता कोळेकर,  निकिता कोळेकर यांनी एक मस्त फ्युजन डान्स सादर केला.  choreographer - श्रुती कुलकर्णी.  

बाप्पा मोरया चा जयघोष करत आले राजस पाटील,  ध्रुव दळवी, शुभम बाहेती, जय मोकाशी,  अर्णव जोशी, शौर्या जैन या सगळ्यांनी एक जोरदार ग्रुप डान्स केला ग्रूप कोऑर्डिनटोर अदिती दळवी आणि choreographer नीलम चिमोटे.  

विश्वाचा पालक तू नायक गणांचा,  गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. . . मोरया रे मोरयाचा असा जयघोष करीत प्रतीक कट्टी, प्रथमेश दुरूगकर,  ध्रुव जोशी, धृती जोशी,  किसले पांडे, अन्वी क्षीरसागर या मुलांनी जोशपूर्ण नाच सादर केला.  Choreography होती मोहिनी दुरूगकर यांची.

अद्वैत गोडसे,  मिंजल बाहेती, अनीश देशपांडे, कुश राऊत, श्रेया मोकाशी, साची शरद,  मिहीर बेंद्रे, श्लोक किणीकर, श्रेणी जैन यांनी शेंदूर लाल चढायो या गाण्यावर मस्त लेझीम खेळत नाच सादर केला.  choreography होती दिव्या पाटील यांची.

लहान मुलांच्या कार्यक्रमानंतर सादर झाले मोठ्यांचे स्कीट वटवट’’ लेखक ---पु. ल.  देशपांडे,  पुनर्लेखन –गौरी करंदीकर दिग्दर्शन – गौतम करंदीकर कलाकार -- गणेश अनभुले,  अनंत गोखले,  अन्वेश जोशी,  वल्लरी जोशी,  विनिता जोशी,  साईप्रसाद जोशी, प्रिया होशिंग,  पराग काजरोळकर,  श्रुती डहाके, श्वेता सावंत,  वसुधा भालेराव,  सीमा बेंद्रे,  आकाशवाणीच्या जमान्यापासून सुरु झालेली कहाणी सध्याच्या whats app च्या वटवटी पर्यंत येऊन समाप्त झाली.  

स्कीट नंतर ऋजुता दुर्वास हिने “मन मंदिरा “ या कट्यार मधल्या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले.  

श्रेया मोकाशी,  स्निग्धा गरुड यांनी नेहा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गजानना तू गणराया हे गाणे सादर केले दिस चार झाले मन पाखरू होऊन हे सुंदर गाणे सादर केले सृष्टी चिल्ला ने वसुधा भालेराव,  सीमा बेंद्रे यांनी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे महाराज यांच्या सिद्धहस्थ लेखणीतून साकार झालेली गजवदना शंभूनंदना हे अतिशय सुंदर असे पद सादर केले –

यांनतर विक्रम चिमोटे,  अवधूत नाडकर्णी,  अनंत गोखले,  सीमा बेंद्रे, अम्रिता देवधर, स्नेहा अभ्यंकर या गुणी गायकांनी सर्व उपस्थितांना सामील करून घेत सादर केली “मोरया धून” –,  ढोलावर आणि झांजावर साथ होती अनुक्रमे वसुधा भालेराव आणि स्नेहा अभ्यंकर यांची.  

मंडळाच्या गणपतीच्या कार्यक्रमातील दिमाखदार नृत्याची परंपरा कायम ठेवीत तीन सरस नृत्ये सादर झाली पहिले होते “सूर निरागस हो” नृत्यदिग्दर्शन ---- ओवी सुंभाते कलाकार --ओवी सुंभाते विनिता जोशी,  वल्लरी जोशी,  दिव्या पाटील,  मोनिका पटाले,  मोहिनी दुरुगकर.

यांनतर सादर झाले तांडव नृत्य नृत्य दिग्दर्शन--- कुलदीप शर्मा कलाकार --आकाश परांजपे,  अक्षय साटम,  अमोल होशिंग,  अक्षय झा.  कुलदीप शर्मा,  स्मिता गोडसे,  प्रिया होशिंग,  नेहा कुंभार,  रिचा चौहान,  अमिता रघुवंशी

सैराट चित्रपटातील झिंगाट डान्स घेऊन आले -- आशिष डहाके,  रोहन नाईक,  स्मिता कांबळे,  नीलम चिमोटे,  पराग आणि ज्योत्स्ना काजरोळकर,  विनोद आणि श्वेताश्री म्हसे,  विशेष सहाय्य – गणेश अनभुले,  प्रणाली पारसनीस

गणपती उत्सव म्हणजे ढोल ताशा पाहिजेच,  कार्यक्रमाची रंगत वाढवत मंडळाचे पथक दाखल झाले सगळ्या उपस्थिताना ताल धरायला लावून ढोलाच्या तालावर नाचवणारे वादक होते रोमेल पारसनीस,  वसुधा भालेराव,  रश्मी गोखले,  अपूर्व परांजपे,  ताशा-- चेतन कुलकर्णी,  गणेश भदाणे,  झांजा ---साईप्रसाद जोशी,  अक्षय साटम,  अमोल होशिंग ढोल पथका पाठोपाठ लेझीम पथकही दाखल झाले त्यात सहभागी होते वल्लरी जोशी,  विनिता जोशी,  मोहिनी दुरुगकर,  ओवी सुंभाते,  अमृता बोरगावकर,  अवंती भागवत,  केतकी बेंद्रे,  अमृता जमगाडे,  प्राजक्ता अंबारे.

या नंतर सामुहिक आरती झाली. सर्व गणेशभक्तांनी गणरायाचे दर्शन आणि मोदकांचा प्रसाद घेतला.  

श्रुती डहाके आणि अस्मिता राऊत यांनी गणरायासाठी सुंदर मखर सजावट केली होती.  संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीपणे सूत्रसंचालन केले स्नेहा अभ्यंकर आणि गौरी करंदीकर यांनी

कार्यक्रमाची सांगता झाली रुचकर भोजनाने.  TO GO Dinner Box मध्ये श्रीखंड,  पुरी,  गुलाबजाम, नवरतन कुर्मा,  पुलाव,  रायता असा बेत होता.  

या यशस्वी कार्यक्रमा मागे परिश्रम करणारे स्वयंसेवक होते.  तिकीट विक्री गौतम करंदीकर,  उदय परांजपे भोजन व्यवस्था समीर आगरकर,  प्रसाद देशपांडे,  सुशील दुर्वास,  सुजित आणि वृषाली कुलकर्णी,  राहुल कुलकर्णी,  कार्यस्थळ व्यवस्था अनंत गोखले,  रश्मी गोखले, अक्षय साटम, अमोल होशिंग,  साईप्रसाद जोशी,  सीमा बेंद्रे,  अन्वेष जोशी, आशिष डहाके,  क्रांतीकुमार राऊत ध्वनी संयोजन मेधा राजगुरू,  योगेश बेंद्रे,  फोटोग्राफी केदार कुंचूर, इंद्राणी कुंचूर मोदक प्रसाद सोनाली मोकाशी,  प्राजक्ता कुलकर्णी,  रश्मी गोखले,  गौरी करंदीकर, योगिता जाधव,  गणपतीबाप्पा मोरया. . ! पुढच्यावर्षी लवकर या. . ! अशा गजरात कार्यक्रम संपन्न झाला !

गणपतीबाप्पा मोरया..! पुढच्यावर्षी लवकर या..!

छायाचित्रे 

व्हीडीओ गॅलरी

आपले स्नेहांकित
मराठी मंडळ============================================================

कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००