II श्री गणेशायनम: I

शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी मराठी मंडळाचा गणेशोत्सव Capen Auditorium येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला. ढोल ताशा लेझीमच्या तालात आणि गणपतीबाप्पा मोरया च्या जयघोषात मिरवणुकीने श्रींचे आगमन झाले.

ढोल ताशा झांज पथकात होते, चेतन कुलकर्णी, गणेश भदाणे, रोमेल पारसनीस, प्रतिक हांडे, अपूर्व परांजपे, अमित शेष, प्रवीण फेंगडे, अनंत गोखले, अक्षय साटम, अमृता गचके आणि अमिताभ श्रीवास्तव यांनी गणपतीची पूजा केली.

रसिका इंगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि नंतर स्टेजवरील कार्यक्रमाला सुरुवात झाली.

ते वयोगटातील मुले गोजिरवाणे ससे बनून स्टेजवर आली आणि प्रेक्षकांची मने जिंकून गेली. सहभागी झाले होते - जय मोकाशी, मिहीर पोतनीस, अबीर पारसनीस, शर्मन गोखले, अथर्व पद्मनावर, आरुष काजरोळकर, रेयांश म्हसे, मेघा अगरवाल, ईशान कुलकर्णी.
संयोजन –रश्मी गोखले

यानंतर आलेल्या मुलांनी आपल्या नाचातून बाप्पालाच नवसाला पाव असे गोड साकडे घातले. बाप्पाकडे निरागस मागणे मागणारे चिमुरडे होते अवनी दळवी, विहा बापट, उर्जा हिंदुराव, तनिषा कामत, आर्या खोत, अनघा जाधव, सई पानस्कर, अन्विता चित्ते, आलिया मोहपात्रा,
संयोजन --- आदिती दळवी

जेजुरीचा मल्हारी मार्तंड आणि पंढरपूरचा विठोबा या आराध्य दैवतांचे गुणगान गात चैतन्यपूर्ण नृत्याविष्कार सादर केला रोनक पोतनीस, धृव दळवी, मिहीर कुलकर्णी, विहान विजयवर्गीय, सोहम मेहता, प्रतीक कट्टी, सुमेध पानस्कर, हर्षल जोशी, अभिन्न सरकार या बालकलाकारांनी. गाणे होते जय मल्हार आणि माउली माउली

लहान मुलांचे निरागस मन रंजकतेने उलगडले “ दिल है छोटासा छोटीसी आशा “ या नृत्याने यात सहभाग होता अनुष्का शेष, गार्गी राउत, ऋतुजा मुसळे, प्रचीती कुलकर्णी, रिया गायकवाड, श्रीया वानखेडे, निकिता कोळेकर, निमिता कोळेकर या गोजिरवाण्या मुलींचा. नृत्य दिग्दर्शन --श्रुती कुलकर्णी.
संयोजन –पूनम शानभाग

नवराई माझी लाडाची .... या धमाल गाण्यावर तेव्हडाच धमाकेदार डान्स सादर केला
अनुष्का लिमये, श्रेनी जैन. अनया जोशी, रिया प्रसादे, श्रेया मोकाशी, सिद्धी हिंदुराव, आर्या दरेकर, शैवी वानखेडे, अन्विता लिमये, दिया पाटील या सख्यांनी
नृत्यदिग्दर्शन -शर्वरी जोशी.

सोहम पाटील ने “वऱ्हाड निघालय लंडनला “ या लोकप्रिय कार्यक्रमाची छोटीशी झलक दाखवली. सोहम ला हा कार्यक्रम प्रचंड आवडतो त्या बद्दलही तो प्रेक्षकांशी बोलला.

एलिझाबेथ एकादशी “ या मराठी सिनेमातील गाडगे बाबांचे मनोरंजक कीर्तन प्रभावीपणे सादर केले गुणी बालकलाकार प्रतिक कट्टी याने.सायन्स आणि अध्यात्म याची सांगड घालत केलेला उपदेश सगळ्यांनाच खूप आवडला.

या कीर्तना नंतर सादर झाली मस्त गाणी. गणेशोत्सवाचे वातावरण भारावून टाकणारी काही विशेष गाणी आहेत त्यातीलच एक गाणे अनुशा नाडकर्णी ने सादर केले “गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया

सृष्टी चिल्ला ने सादर केली मेडली..पहिले गाणे होते वंदना विटणकर यांची काव्यरचना “नयन तुझ साठी.... आणि दुसरे गाणे होते “अंगणी माझ्या मनाच्या...

यानंतर ऋजुता दुर्वास, तन्वी शेगांवकर, इंस्तीना यांनी भरतनाट्यम या अभिजात नृत्यप्रकारातून सुरेख गणेशवंदना सादर केली.

यंदा बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला.आयुष्यभर छत्रपतींचे गुणगान गात शिवशाहीर पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील घराघरात प्रभावीपणे शिवचरित्र पोहोचवले. त्यांच्या या कार्याला सलाम...!

बाबासाहेबांचे कार्य सध्याच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचले आहे असा जणू संदेश देण्यासाठी आमचे मावळे घेऊन आले एक जोशपूर्ण नृत्य. जय शिवाजी जय भवानी ---चा जय जयकार करत शिवचरित्राचे त्यांनी जोषपूर्ण सादरीकरण केले. यातील गुणवंत बालकलाकार होते..अनीश देशपांडे, मल्हार तावरे, अंशुमन थोरवे, कुश राउत, सिद्धेश चेकुरी, मिहीर बेंद्रे, श्लोक किणीकर, कौशल धुमाळ,
जिजाबाई– दीप्ती तावरे,  
त्यदिग्दर्शन -- पुष्पा थोरवे, दीप्ती तावरे.

यानंतर कार्यक्रमाचा उत्तरार्ध सादर झाला.

सीमा बेंद्रे यांनी “ओंकार प्रधान रूप गणेशाचे “ या गाण्याने उत्तरार्धाची सुरेल सुरुवात केली.

नंतर प्रेक्षकांनी आस्वाद घेतला कांदेपोहे या म्युझिकल स्कीट चा. नव्या पिढीची नवी प्रेमकहाणी खुसखुशीत पणे सादर झाली, सोबत होती धमाल गाण्यांची आणि नृत्याची फोडणी. मग काय हे “कांदेपोहे” खूपच खमंग झाले.
यातील कलाकार होते अमोल होशिंग, प्रियदर्शनी होशिंग, मनोज सावंत,पूनम सावंत, सुजीत कुलकर्णी, आरती थापर, प्राची ठाकरे, अनामिका बेराड, प्रियांका मानेकर, प्रिया चिंगलवार, आशय सुंभाते, विशाल कुलकर्णी
संवाद लेखन – मनोज सावंत
दिग्दर्शन—----- गणेश अनभुले
नृत्यदिग्दर्शन –अक्षय साटम आणि प्रियदर्शनी होशिंग

या नंतर सादर झाला “ उदे गं अंबे उदे हा देवीचा गोंधळ. देवीच्या श्लोकाने सुरुवात करून सुंदर नृत्याभिनायातून स्त्री शक्तीचे प्रतीक असलेल्या अंबेचे दर्शन घडवले, आणि मग सुरु झाला देवीचा जागर...या सुंदर नृत्याविष्कारतील कलाकार होते..श्वेताश्री म्हसे, वृषाली कुलकर्णी, स्मिता गोडसे, रोहिणी बागूल, आर्चीसा सूद आणि स्वाती गुप्ता.

करमणुकीच्या कार्यक्रमाची सांगता झाली “ गणेश आरती नृत्याने. कलाकार होते प्रीती गांधी, अनुशा, अनुपमा अंबरखाना, रागिणी राजपाली, श्वेता पुरोहित.

रसिका इंगळे –सिंघम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीपणे सूत्रसंचालन केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन केले होते मेधा राजगुरू यांनी.

या नंतर सामुहिक आरती झाली.सर्व गणेशभक्तांनी गणरायाचे दर्शन घेतले. ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणेशाची आपल्यावर खरोखर कृपा आहे, मंडळात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते..इतकी की कलेची जणू लाटच आली आहे असा देखावा यंदाच्या सजावटीत केला होता. सजावट करणारे कलाकार होते पूर्णिमा मानकामे आणि इंद्राणी कुंचूर.

कार्यक्रमाची सांगता झाली रुचकर मोदकाच्या प्रसादाने आणि भोजनाने. TO GO Dinner Box मध्ये जिलेबी, नवरतन कुर्मा, पुलाव, अळूची वडी, काकडी कोशिंबीर असा बेत होता.

या यशस्वी कार्यक्रमा मागे परिश्रम करणारे स्वयंसेवक होते..

तिकीट विक्री  अभिजीत नेरुरकर, उदय परांजपे 
Welcome drink ( Rose milk) आरती आणि प्रवीण फेंगडे
भोजन व्यवस्था  समीर आगरकर, सिद्धार्थ खाडे, प्रसाद देशपांडे, सुशील दुर्वास, ज्ञानेश्वर तावरे, वृषाली कुलकर्णी, अनुराधा पानस्कर, विनोद म्हसे, सदानंद कन्नावार, योगेश बेंद्रे,निशांत बागूल 
कार्यस्थळ व्यवस्था अनंत गोखले, स्वप्नील जाधव, प्रवीण फेंगडे,अक्षय साटम,अमोल होशिंग सुजीत कुलकर्णी,मोहित पोतनीस, गौरी करंदीकर 
लहान मुलांच्या कार्यक्रमाचे संयोजन रश्मी गोखले, शर्वरी जोशी 
फोटोग्राफी केदार कुंचुर
ध्वनी संयोजन मेधा राजगुरू
मोदक प्रसाद दीपाली देशपांडे, श्रुती डहाके, गायत्री भदाणे, वर्षा धुमाळ, आरती फेंगडे,आदिती दळवी 

 

यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना महाराष्टावर असलेल्या दुष्काळाचे भान ठेवत मंडळाने सर्वाना “नाम“ या नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या संस्थेसाठी निधीसंकलना साठी आवाहन केले होते. आपल्या सभासदांनी मनापासून प्रतिसाद देत खारीचा वाटा उचलला आणि $2500 निधी जमा झाला.आणि नाम या संस्थेला मंडळाने Rs.164000 पाठवले.

आपल्या गावातील गणेशोत्सवात ही मंडळाच्या सभासदांनी थोडासा सहभाग घेतला
मंडळाने २४ सप्टेंबर रोजी हिंदू टेंपल मध्ये अथर्वशीर्ष आवर्तन आयोजित केले होते.
आवर्तानांतर अनंत गोखले, प्राची परांजपे, निलीमा क्षीरसागर, आणि श्री. विजय जोशी यांनी सुरेल भक्तीगीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली..!

तसेच रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी आपल्या हिंदू टेंपल (HTBN ) मधील "गणपती विसर्जन". मिरवणूकी मध्ये मराठी मंडळ ढोल ताशा लेझीम पथक सामील झाले.. या पथकात सहभागी होते, चेतन कुलकर्णी, प्रसाद जोशी, श्रेयस चव्हाण, गणेश अनभुले, अमित शेष, प्रतिक हांडे

आपल्या या गुणी कलाकारांनी अप्रतीम वादन करून उपस्थितांची वाहवा मिळवली
विघ्नहर्त्या गजाननाला पुढच्या वर्षी लवकर या असा भावपूर्ण निरोप देत यंदाचा गणेशोत्सव संपन्न झाला.

छायाचित्रे - मराठी मंडळ "गणेशोत्सव"

छायाचित्रे - हिंदू टेम्पल "गणेशविसर्जन"

व्हीडीओ गॅलरी

धन्यवाद,
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्ट्न - नॉर्मल


============================================================





कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००