~~~~~~~~~~~~
करी पाश घे, अंगी सिंदूर साजे
गळा माळ मुक्ताफळांची विराजे ।
जना दु:खहर्ता, तसा सौख्यादाता
नमू देवदेवा गणेशा अनंता ।।

गणेशोत्सव म्हंटलं कि डोळ्यांसमोर येते ती गणपतीची सुंदर सुबक मूर्ती, दुर्वा आणि लाल जास्वंदी.
गणेशोत्सव म्हणजे तल्लीन होऊन म्हंटलेल्या आरत्या आणि मोदकांचा नैवेद्यही !

प्रथेप्रमाणे २०१४ सालचा गणेशोत्सव ६ सप्टेंबर रोजी हिंदू टेम्पल ब्लुमिंगटन - नॉर्मल येथे खूप उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. मराठी मंडळ  ब्लुमिंगटन - नॉर्मल गेले १५ वर्ष ही संस्कृती सातत्यानी जपण्याचा प्रयत्न करत आहे.

या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते ढोल-ताशा-लेझीम पथक! ताशा कडाडला, ढोलाने ताल दिला आणि लेझीम पथकाने लयबद्ध लेझीम खेळून रंगत  वाढवली. या वाद्यांच्या तालावर अस्सल मराठमोळी पावलं थिरकली नसती तरच नवल! फुगड्या, नाच अशा संपूर्ण जल्लोषात लाडक्या गणरायाचे स्वागत झाले.

शिरीष आणि सेजल राणे यांनी गणेशपूजना साठी सुंदर सजावट केली होती. श्री. सुरेश व सौ. प्रियांका मलन यांच्या हस्ते गणेशाची स्थापना आणि पूजा करण्यात आली. 

ढोल पथकातले कुशल  वादक होते  रोमेल पारसनीस, आशिष डहाके, नागेश गालपल्ली, अमित शेष, स्वप्नील राउत, गणेश भदाणे, अनिरुद्ध गोडबोले, अक्षय साटम. पथकाला अमूल्य मार्गदर्शन केले होते पिओरियाचे चेतन कुलकर्णी यांनी.

लेझीम पथकाचे प्रशिक्षक होते गौरव नारखेडे. सहभागी झाले होते गौरव आणि युगंधरा नारखेडे,आरती आणि प्रवीण फेंगाडे,ज्योती पाटील, वर्षा आणि कौशल धुमाळ, तन्वी डोळ, गायत्री भदाणे, पल्लवी निकम, रेश्मा अनभुले,कल्याणी गालपल्ली  अपर्णा जावळकर,निशांत बागूल, आणि ज्ञानेश्वर तावरे.

यानंतर दर वर्षीप्रमाणे लहान मुलांचे व मोठ्यांचे करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यात आले.

लहान मुलांच्या कार्यक्रमांचे सर्व नियोजन केले होते रश्मी गोखले आणि अनुजा दुर्वास यांनी.

  • सर्वप्रथम २ ते ४ वयोगटातील चिमुकल्यांनी "उंदीरमामा उंदीरमामा थाट तुमचा फार" या गाण्यावर नृत्य सादर केले. उंदीरमामाला माउस कार म्हणणारे हे छोटे कलाकार होते : अवनी दळवी,  अनघा जाधव, तनिषा कामत, माही झगडे, उर्जा हिंदुराव, जय मोकाशी, अबीर पारसनीस, राजस पाटील, ईशान कुलकर्णी आणि शर्मन गोखले.
  • यानंतर "अनिश देशपांडे" याने प्र. के. अत्रे यांची "आजीचे घड्याळ" ही कविता मोठ्या प्रभावीपणे सादर केली. कविता ऐकून सर्वांना आपल्या आजीची आठवण झाली असणार यात शंका नाही!
  • दुनियादारी या चित्रपटातील "टिक टिक वाजते डोक्यात" या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केलेले कलाकार होते :  रिया गायकवाड, अनुष्का शेष, निकिता कोळेकर, निमिता कोळेकर, गार्गी राउत आणि प्रचिती कुलकर्णी.
  • यानंतर श्रेया मोकाशी आणि कौशल धुमाळ यांनी "आले रे गणपती" हे भक्तिपूर्ण गाणं सादर केलं.
  • मित्र एकमेकांना भेटल्यावर जगाला विसरून जातात आणि खेळण्यात गुंग होऊन जातात. "गण्या, मन्या, तुका … फुलपाखरू" या गाण्यांवरील नृत्यातून अशीच धमाल केलेले कलाकार होते : ध्रुव दळवी, मिहिर कुलकर्णी, विहान विजयवर्गीय, अंगद राउत, हर्शल जोशी, सोहम मेहता, रोनक पोतनीस आणि रुजुला मुसळे.         
  • नाट्यछटेतुन आपले निरागस विचार चोखपणे मांडून "अनिश देशपांडे" याने मोठ्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आणि त्याचबरोबर सर्वांचे मनही जिंकले. 
  • रिया प्रसादे आणि स्निग्धा गरुड या दोघींनी "अशी चिक्क मोत्याची माळ" या गाण्यातून गणपतीबाप्पाचे वर्णन सुरेखपणे सादर केले.स्वरसाथ केली होती प्रसन्न माटे यांनी .
  • यानंतर "धीम देरे ना" या संगीतावर ऋजुता दुर्वास आणि ग्रीष्मा राउत यांनी नेत्रसुखद सेमी-क्लासिकल नृत्य सादर केले.
  • लहान मुलांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा शेवट बहारदार कोळीनृत्याने झाला. या नृत्यामध्ये भाग घेणारे कोळी होते : श्लोक किणीकर, मल्हार तावरे, शारीनी मेनन, श्रेया मोकाशी, सिद्धी हिंदुराव, यश राणे, दिया पाटिल, कौशल धुमाळ, श्रुतीलया  वेंकट, चैत्रा कोन्दाविती आणि ओजस शाह.

 

सर्वच लहान मुलांनी या कार्यक्रमासाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी होती. पालकांच्याही मनात "याच साठी केला होता अट्टाहास… " अशी भावना असणार यात शंका नाही!

मोठ्यांच्या कार्यक्रमा मध्ये सर्वप्रथम गाणी सादर केली गेली. महाराष्ट्रातील अनेक देवी-देवता, श्रद्धास्थानांचे स्मरण करून देणारी आणि त्यांना वंदन करणाऱ्या या सर्वच गाण्यांनी वातावरण एकदम प्रसन्न करून टाकले होते.
श्री. सुनील चिमोटे यांनी "ओंकार स्वरूपा" आणि "अबीर गुलाल " ही भक्तीपर गाणी सादर केली. मयुरी कुलकर्णी ने "नवरी नटली" चा ठेका चांगलाच पकडला. तर विक्रम चिमोटे याने "मोरया मोरया " आणि "माउली " या गाण्यांमधून गणेशाचा आणि विठ्ठलाचा जयघोष केला. या सर्व गाण्यांमध्ये श्रोते एकदम रंगून गेले होते.

यानंतर प्रथेप्रमाणे यावर्षी मोठ्यांच्या नृत्यातून सादर झाला...अष्टविनायक..  असं म्हणतात, आठ ठिकाणी स्वयंभू प्रगट झालेले हे गणपती  म्हणजे अत्यंत जागृत देवस्थानं आहेत. आपल्या मंडळातील कलाकारांनी अतिशय सुंदरपणे अष्टविनायकाचा नृत्याविष्कार साकारला! रसिकांसाठी हे नृत्य म्हणजे एक पर्वणीच ठरली.
संकल्पना ---दिप्ती तावरे. नृत्यदिग्दर्शन ---कुलदीप शर्मा
कलाकार ---दिप्ती  तावरे, अनामिका  बेराड, सुखदा खोंबारे, नीलम चिमोटे, प्रियांका मानेकर, कुलदीप शर्मा, अक्षय साटम, आकाश परांजपे,
दिपक माहेश्वरी, पराग काजरोळकर, रोहन नाईक, स्वप्नील राउत, विनोद म्हसे, गणेश भदाणे आणि नागेश गालपल्ली. 
या नृत्यासाठी युगंधरा नारखेडे यांनी अष्टविनायकांचे मंदीर आणि सजावट  केली. विशेष सहाय्य होते श्रुती डहाके यांचे.

यानंतर  सामुहिक गणपतीची आरती चांगलीच रंगली. अथर्वशीर्ष पठणाने वातावरण एकदम भारून गेले होते.  असा हा मराठी मंडळाचा गणेशोत्सव म्हणजे संस्कृती आणि कलाकृती यांचा सुरेख संगम आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते मदती साठी नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या सहकार्या बद्दल शतश: धन्यवाद.


तिकीट विक्री

गौतम करंदीकर, उदय परांजपे, अभिजीत नेरुरकर

ध्वनी आणि पार्श्वसंगीत

आशिष डहाके

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

दीपाली देशपांडे

कार्यस्थळ व्यवस्था

गौरी करंदीकर,सिद्धार्थ खाडे,पल्लवी खाडे, गौरव नारखेडे, अनंत गोखले, संतोष हिंदुराव,सुशील दुर्वास, प्रसाद देशपांडे, स्वप्नील राउत, दीपिका राउत, केदार कुलकर्णी, अक्षय साटम, नागेश गालपल्ली

व्हिडीओ रेकॉर्डिंग

मुक्ता आणि मंदार कुलकर्णी, विशाल कुलकर्णी

फोटोग्राफी

गौरव नारखेडे, विनय मोकाशी,स्वप्नील राउत

 

 

गणरायाची मूर्ती डोळ्यांत साठवत आणि पुढच्या वर्षी लवकर या ही साद घालत सगळे भारावलेल्या मनानी परतले.

गणपती  बाप्पा मोरया !
पुढच्या वर्षी लवकर या !!

वृत्तांकन
दीपाली देशपांडे.

कार्यक्रमाची छायाचित्रे 
व्हीडीओ गॅलरी


               







कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००