गणेशोत्सव - २०११

 मांगल्य  व चैतन्याचे प्रतिक असणारा गणेशोत्सव १० सप्टेंबर,२०११ रोजी केपन सभागृहात उत्साहात साजरा झाला. ब्लुमिंग्टन् नॉर्मल मराठी मंडळाच्या गणेशाचे आगमन खास महाराष्ट्राची परंपरा असलेल्या “लेझीमच्या” गजरात  आणि ''मोरया''  च्या  घोषात   झाले.

आशिष
  व श्रुति  डहाके  आणि अभय  व प्राची  थप्पन यांनी गणपतीची पूजा केली.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक  गौरी करंदीकर  यांनी उपस्थितांचे  स्वागत  केले  आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.

लहान मुलांच्या कार्यक्रमाची सुरुवात मौशमी भट आणि ग्रीष्मा राउत यांच्या भावपूर्ण  ''गणेशवंदनेने''  झाली.

 ३ ते ५ वयोगटातील छोट्या चमूंनी ''चला मुलांनो आज पाहुया शाळा चांदोबा गुरूजींची'' हे दिमाखदार नृत्य आपापल्या आईच्या मार्गदर्शनाखाली सादर  केले.  सादर  करणारे चमू होते. कार्तिक कदम, सारा कुलकर्णी, आर्यन निगम, रिया गायकवाड, अर्जुन निगम, अनुष्का शेष, ध्रुव दळवी,कनका भगवत ,विहान विजयवर्गीय,सुमेध पानसकर, मधुरा यादव,वेद भट.
 
''अशी चिक मोत्याची माळ''  हे गणपतीचे रूपकात्मक समूहगान  सादर केले अनुष्का लिमये, अन्विता लिमये,आर्या  ठोम्बरे आणि मौशमी भट  यांनी. तर  गौरी सरदेसाई संगीतदिग्दर्शन केले होते.

यानंतर मनिमाऊ म्हणजेच कनका भागवत या चिमुकलीने आपल्या इवल्याशा हावाभावाने ''मनीच्या कुशीत झोपलय कोण'' सादर केले.

रिया
गुर्जर, चिन्मय शेंडे,आर्य कोलते, श्रेया मोकाशी, अनीष अगरवाल, अनमोल कर्णिक, सिद्धि गोखले, सोहन पागनिस, मृणांक पांडा, अविशि कोलते यानी  '' उतुंग भरारी घेउया... मी मराठी'' या गाण्यावर  “फॅशन शो” सादर केला.  त्याना मार्गदर्शन मीनल गुर्जर यांनी केले होते.  

राधा
वाघ हिने आपल्या सुस्पष्ट आवाजात '' बुड बुड घागरी'' ही बोधकात्मक गोष्ट सर्वांसमोर सादर केली.  

''
राधा ही बावरी'' या गाण्यावर एक बहारदार नृत्य सोनल गानु आणि सिद्धि हिंदूराव यांनी सादर केले.

यानंतर ऋजुता दुर्वास हिने दरवर्षीच्या प्रथेनुसार '' ही मायभूमी ही जन्मभूमि''   गाणे सादर केले.

लहान मुलांच्या कार्यक्रमाची सांगता मीरा वाघ हिने ''मोदकवाल्या बाप्प्पा तूझी कित्ती कित्ती नावे'' या गोड गाण्याने केली.

यानंतर मोठ्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

शिकागो येथे नुकतेच संपन्न झालेले BMM  अधिवेशन गाजवून आलेल्या आपल्या कलाकारांनी सादर केले   ''फु बाई फु '' फेम सचिन मोटे लिखित गौतम करंदीकर दिग्दर्शित  स्कीट’ ''वधुपरिक्षेसाठी   NRI   कोकणात ''  सादर करणारे कलाकार होते. गौतम करंदीकर, अभिजित नेरुरकर, गौरी करंदीकर, अनिरुद्ध गोडबोले, शिवानी गोडबोले.

 अमृता माटे आणि  प्रियांका श्रोत्रीय यांनी आपल्या मोहक नृत्याविष्काराने गणेशवंदना सादर केली. या दोघींनीही शिकागो BMM मराठी अधिवेशनात युवाकलाकार म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. 

यानंतर ईशान नेरुरकर याने गिटार व कीबोर्ड यावर एक हिंदी आणि मराठी गाणे वाजवून आपले वाद्यकौशल्य सादर केले.

''
मिशन ब्लूमगाव'' या स्कीट मध्ये ब्लुमिंग्टन् मधील जोडप्यांचे खुसखुशीत अनुभव आपल्या लेखन व दिग्दर्शन कौशल्याने साभिनय सादर केले अनिरुद्ध गोडबोले यांनी तर त्याला ठसकेबाज सहकलाकाराची साथ दिली मयुरा सातूर यांनी. 

BMM आणि ईप्रसारण यांच्य़ा संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या गायनाच्या “स्वरांगण” स्पर्धे   मधल्या  मिडवेस्ट च्या गायिका आरती कुलकर्णी यांनी आपल्या सुरेल आवाजात दोन गाणी सादर केली.  ''आले रे गणपती'' आणि श्रीनिवास खळे संगीत दिग्दर्शित ''श्रावणात घन निळा बरसला.''    

यानंतर प्रेक्षगृहात हास्यकल्लोळ उडविणारे ''शहाजहान पुण्यात'' हे गौतम करंदीकर दिग्दर्शित स्कीट सादर झाले.आपल्या परिपक्व अभिनयाने अस्सल पुणेकर सादर केला गौतम करंदीकर यांनी ''शहाजहान'' च्या तडफदार भूमिकेची अदाकारी अभिजीत नेरुरकर यांनी सादर केली.तर शहाजानला आपल्या अभिनयाने  अनिरुद्ध गोडबोले यांनी उत्तम साथ दिली.  

यानंतर गणेशाची महती सांगणारे भजन ''जय गणेश जय गणेश देवा'' गौरी सरदेसाई यांनी भजनात प्रेक्षकांनाही सहभागी करुन घेत  सादर केले .त्यांना साथ दिली गौरी करंदीकर, अनंत गोखले, देवयानी गोडसे व  मंदार कुलकर्णी यांनी. 

वन्समोअर”  घेत कार्यक्रमाच्या उत्तराधात प्रेक्षकांना सध्याच्या पिढीतील updates देणारा  रॉकिंग "ढिक-चिका" डान्स रिटा बायस, प्रियांका गजबे, प्राची वाळके, मेधा मनोहर, अपूर्वा जोशी, रोहित मनुजा , रितेश शेट्टी, पराग काजरोळकर, वेंकटेश्वर राव मुसला, अंकुर प्राशर, संदीपकुमार सिंग. यांनी  ‘वन्समोअर’  घेत सादर केला.  नृत्य दिग्दर्शन केले होते रिटा बायस यांनी .

कार्यक्रमाची सांगता लावणी गोंधळ  या मराठी नृत्यसंगीतातील प्रकाराने झाली. ‘’वन्समोअर”  घेत हे उत्तम नृत्य दणक्यात सादर केले होते. शानू त्यागी, शिवानी गोडबोले, अमिता रघुवंशी, सुखदा कोम्भारे,निहारिका देसाई यांनी केले होते. तसेच शानू त्यागी यांनी नृत्यदिग्दर्शन केले होते.

विशेष उल्लेखनीय "गौरी करंदीकर" यांनी आपल्या सहज सादरीकरणातून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाची रंगत वाढवली.

सांस्कृतिक कार्यक्रमानंतर श्री गणेशाची आरतीअर्थवशीर्ष झाले. सर्वांना मोदक व पेढ्यांच्या प्रसाद देण्यात आला.

सूत्रसंचालक गौरी करंदीकर यांनी सर्वांचे आभार मानले.

यानंतर सर्वांना ‘’Dinner Box’’ देण्यात आले. हा उपक्रम यंदाच्या गणेशोत्सवापासून सुरु करण्यात आला.

यंदाच्या कार्यक्रमाचे स्वयंसेवक होते

कार्यस्थळ व्यवस्था  गौरी करंदीकर
कार्यक्रम व्यवस्था अनंत गोखले
सजावट ज्ञाती वाघ, अनुजा दुर्वास, अनुराधा गोडबोले, रश्मी गोखले, रती पेडणेकर, मीनल लिमये.
पेढे गौरी करंदीकर, निवेदिता कुलकर्णी, रश्मी गोखले.
मोदक आषिश डहाके,श्रुती डहाके,प्रणीता कुटे, रत्नप्रभा पाटील,
तिकिट विक्री निवेदिता कुलकर्णी, अनंत गोखले, आशिष गोडबोले, अभिजीत नेरुरकर, मोहित पोतनीस, सुशील दुर्वास, सागर पाटील आणि गौतम करंदीकर 
भोजन व्यवस्था श्वेताश्री मुखर्जी, विनोद म्हसे, श्वेता बनसोड, ज्योत्स्ना काजरोळकर, स्वाती कांबळे, तरुण देवांगण, अनन्या रोटकर, कृष्णा अगरवाल, गणेश भदाणे, रोहन नाईक आणि राजलक्ष्मी,आषिश चंदा, रश्मी डेहाळे, सौरभ काळे
ध्वनी योजना मोहीत पोतनीस, रश्मी गोखले
फोटोग्राफी रोहन गुर्जर, शिरीष खापरे
विशेष आभार अमित शेष व मंदार पत्की

 

रश्मी  गोखले

कार्यक्रमाची छायाचित्रे



कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००