गणेशोत्सव २००७ - वृत्तांत


ब्लुमिंग्टन्-नॉर्मलवासी मराठी मंडळी आतुरतेने ज्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात तो गणेशोत्सवाचा कार्यक्रम अतिशय आनंद आणि उत्साहात दिनांक २२ सप्टेंबर २००७ रोजी किंगज्ले ज्युनिअर हायस्कूल, नॉर्मल इथे पार पडला.

अर्थातच समारंभाचा आरंभ गणरायाच्या आरतीने झाला. प्रसाद वाटपानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.

या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा बालकलाकारांचे सर्वात जास्त विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. यात अगदी लहान म्हणजे २ वर्षापासून ते १२ वर्षाच्या वायोगटातील मुलांचा सह्भाग होता. या समारंभास जवळ जवळ ३०० पेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे मराठी भाषिक नसलेले भारतीय देखील हा कार्यक्रम बघण्यास आवर्जून आले होते.

भारतीय रंगभूमीच्या परंपरेनुसार सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नमनाने झाली. कुणाल सामंत, अनामय देशपांडे, अक्षय बुचे, सुर्हुद राउत व श्रेयस चौधरी या बालकलाकारानी हे नमन नृत्य सादर केले.

नमनानंतर ३ ते ४ वर्षे वयोगटातील मुलानी श्लोक पठण केले या मध्ये आर्या कोलते , मीरा वाघ ,रिया बाजवाला, ध्रुव गोखले , ऋजुता दुर्वास , मल्हार कमलापुर, ऋता कान्हेरे, सिद्दी गोखले, प्रिया जोशी, आदित्य नरसाळे, अदिती परांजपे, मौसमी भट यांचा सहभाग होता. याच सर्व बाल दोस्तांनी नंतर "किती वेळा सांगितले बापा तुम्हाला" या गाण्यावर नाच सादर केला.

या वर्षी कार्यक्रमाचा क्रम खूप विशिष्ट पध्दतीने आयोजिला होता. लहान मुलांच्या या नाचानंतर ७ ते ८ वर्षाच्या मुलीनी 'या खेळा नाचा' या धम्माल गीतावर नृत्य सादर केले. यातील बालमैत्रिणी होत्या सानिका बुचे, अलीशा नाडकर्णी, पल्लवी परांजपे, मानसी साठे, श्रीया मालपाणी, श्रेया जामसंडेकर आणि गार्गी खेर. दिग्दर्शन केले होते सोनाली परांजपे व श्वेता जामसंडेकर यानी. आणि विशेष सहाय्यक होत्या आदिती साठे.

या उत्साही नृत्यगीतानंतर सर्वात लहान म्हणजे २ ते ३ वर्षे वयोगटातिल रमा टोणपे, वैदेही पाटील, सेजल माळी, सोहन पागनिस, इशान जोशी यानी 'गोरी गोरी पान' या लोकप्रिय गाण्यावर छान नाच सादर केला. हा नाच बसवला होता तनुजा पागनिस, पल्लवी टोणपे व सीमा माळी यानी.

मागील वर्षी जिने सुंदर कथाकथनाने सर्वांचे लक्ष वेधले होते त्या श्रध्दा भिडेने याही वर्षी ‘भिकंभटाची’ विनोदी गोष्ट सांगुन प्रेक्षकाना हसवले.

कथाकथनानंतर अनामय देशपांडे याने विंदा करंदीकरांची 'भुतावळ' ही कविता उत्कृष्टपणे आवाजातील चढ़ उतारांसह सादर केली. याला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून उत्तम प्रतिसाद दिला.

या नंतर ४ ते ५ वर्षे वयोगटातिल अभिरू राउत, वेद लोंबार, आर्या जोशी, साची टेके, ग्रीष्मा राउत, रुचा खेर, पूर्वा आडके, सानिका कुलकर्णी, स्वराज सोनावणे यानी 'आज गोकुळात रंग' या गीतावर बहारदार नृत्य सादर केले. नृत्य दिग्दर्शन केले होते आश्लेशा राउत आणि शिल्पा लोंबार यानी तर विशेष सहाय्य होते पूनम राउत यांचे.

या छोट्या दोस्तांच्या विविध गुणदर्शनातील शेवटचा पण विशेष उल्लेखनीय कार्यक्रम होता 'गाणार्‍या गावाची गोष्ट' ही विनोदी नाटिका. यामधे सहभागी झालेली बाल मंडळी होती रवि मालपाणी, कुणाल सामंत, श्रेयस चौधरी, सुहृद राउत, अनामय देशपांडे, अक्षय बुचे, श्रध्दा भिडे, अलीशा नाडकर्णी, सानिका बुचे, मानसी साठे, पल्लवी परांजपे, श्रीया मालपाणी, श्रेया जामसंडीकर आणि गार्गी खेर. या नाटकाचे संवाद लेखन केले होते कनका सामंत यानी तर दिग्दर्शन होते अश्विनी देशपांडे व सोनाली परांजपे यांचे. नाटकाच्या विशेष सहाय्यक होत्या आदिती साठे.

छोट्या कलाकारांच्या या भरगच्च कार्यक्रमानंतर मोठ्यांची वसंत सबनीस लिखित 'इन्वेस्टमेंट' ही एकांकिका सादर करण्यात आली. ही एकांकिका छान रंगली. कलाकारांच्या सुंदर अभिनयाने आणि संवाद फेकीने सभागृहात सारखा हशा पिकत होता. या विनोदी नाटकाने प्रेक्षकांना अगदी पोट धरुन हसवले. नाटकातिल रंगतदार कलाकार होते मयुरा सत्तुर, रोहित खळदकर, केदार भागवत, सचिन टकले, श्रीकांत नरसाळे, मनोज पागनिस, समीर खिलारे, सुदर्शन पलांडे, पल्लवी मुन्ड्ले आणि भाग्यश्री भोंडे. नाटकाचे दिग्दर्शक होते योगेश सावंत आणि विशेष सहाय्य केले होते पल्लवी टकले यानी.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता झाली 'मी मराठी' या नृत्यविष्काराने. विलक्षण प्रभावी अशा या ताज्या गाण्यावर कुशल कलाकारांचे नृत्य आयोजन विशेष उठावदार ठरले. देवळावर जसा सोन्याचा कळस चढवावा त्याप्रमाणे या नृत्यगीताने आधीच रंगलेल्या समारंभाची शान आणखीनच वाढवली. हे सादरीकरण इतके सुंदर झाले की प्रेक्षकांच्या टाळ्यानी आणि 'once more' च्या नार्‍यांनी सभागृह दुमदुमून गेले. आयोजकानी आणि कलाकारानी प्रेक्षकांच्या विनंतीला मान देवुन हे दमदार नृत्य संपूर्णपणे पुन्हा सादर केले.

या नृत्यातिल सुनयना मोहिते यानी साकारलेली 'देवी महिषासुरमर्दिनी' लक्ष्यवेधी ठरली. सुनील मुंडले आणि जयेश मोहिते यांचे नृत्यदिग्दर्शन आणि गाण्याच्या अर्थाशी जोडलेले रचनात्मक आयोजन इतके कल्पक व प्रभावी होते की प्रेक्षकांचे रोमांच उभे राहिले आणि 'मी मराठी' या भावनेने मन उचंबळुन आले. यासाठी या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नृत्त्यात सहभागी कलाकार होते, स्वरूप कांबळे, विभा महाजन, चेतना शेंडे, सुनयना मोहिते, जयेश मोहिते, सुनील मुंडले, अंोल परब, रवीन्द्र साळवी, अभिजीत कुलकर्णी, मितेश सारवणकर, समीर खिल्लारे, नितिन महाजन, अभी शेंडे, योगेश सावंत, रोहित खळदकर, अनंत गोखले, श्रेयस चौधरी आणि अक्षय बुचे.

अशा या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंोल परब व सोनाली परब यानी उत्तमरित्या पार पाडले.

त्यानंतर नेहमीप्रमाणे रुचकर भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणताही कार्यक्रम स्वयंसेवकांच्या मदतिशिवाय यशस्वी होवूच शकत नाही. यावर्षीच्या कार्यक्रमाचे स्वयंसेवक होतेः

भोजन व्यवस्था        

सजावट          

प्रवेशद्वारावरील तिकिट विक्री     

योगेश सावंत           

अनिकेत वैद्य            

अभि शेंडे                   

रोहित खळदकर  

राहुल खांडेकर          

बाळकृष्ण कामत

नीलेश कुलकर्णी         

चंद्रजीत पाटील          

चंद्रजीत पाटील

चंद्रजीत पाटील        

सभागृह व्यवस्था         

फणिन्द्र केतकर

अनंत गोखले           

बाळकृष्ण कामत        

छायाचित्रण

अनिकेत वैद्य           

फणिन्द्र केतकर

रोहन गुर्जर

अतुल नेवासे  

मनोज पागनिस

पेढे

बाळकृष्ण कामत        

अभिजीत कुलकर्णी

मधुरा देसाई       

गीतेश भट             

ध्वनि व्यवस्था            

निवेदिता कुलकर्णी           

नवीन भट              

जयेश मोहिते           

गौरी करंदीकर

केदार भागवत          

उपेन्द्र वाघ            

लहान मुलाना सांभाळणे       

मयुरेश देशपांडे           

समीर खिलारे           

मृण्मयी देशपांडे  

मितेश सारवणकर       

अनंत गोखले         

पूनम राउत

रवीन्द्र साळवी          

नितिन महाजन

गौरी करंदीकर

समीर चौबळ           

भोजन व्यवस्था         

भोजन व्यवस्था         

समीर खिलारे

शशांक चाळके  

शशांक चाळके   

उत्कर्ष कणसे   

विशाल पाटील

सचिन बुचे 

तिकिट विक्री

तिकिट विक्री

तिकिट विक्री

अभि शेंडे

रोहित खळदकर

गौतम करंदीकर

उपेन्द्र वाघ

नितिन महाजन

योगेश सावंत

रणजीत जोशी

श्रीस्वरूप जोशी

श्रीस्वरूप जोशी

धनंजय आडके

चंद्रजीत पाटील

कुणाल पोकळ

प्रसन्न माटे

अभिजीत कुलकर्णी

समीर बेंद्रे

निवेदिता कुलकर्णी

पल्लवी मुंडले

 गणपती समोरील रांगोळी : अनुजा दुर्वास

प्रेक्षकांसह या सर्वांच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी कार्यक्रम प्रमुख सुनील मुंडले यानी पार पाडली. .

कार्यक्रमाची छायाचित्रे

कार्यक्रमाची क्षणचित्रे (videos)


 • नमन
 • एकांकिका (इन्व्हेस्टमेंट)
 • लहान मुलांचे नृत्त्य (“आज गोकुळात रंग...”)
 • लहान मुलांचे नृत्त्य (“गोरी गोरी पान... ”)
 • कविता वाचन (“किर्रर्र रात्री.. . ”)
 • नृत्याविष्कार (“मी मराठी”)

 • - आश्लेशा राउत


  कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
  २०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००