गणेशोत्सव २००६ - वृत्तांत
ब्लूमिंग्टन - नॉर्मल मराठी मंडळाने आपल्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या वर्षीदेखील गणपती उत्सव मोठया उत्साहाने साजरा केला. सुरूवातीला 'गणपती बाप्पा मोरया' च्या गजरात बाप्पांचे सभागृहात स्वागत झाले. नंतर पार पडली ती बाप्पांची आरती.
यावेळी मंडळाच्यावतीने करमणूकीच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी 'प्लाविनी निर्मळ' यांनी भरत नाट्यम' नृत्यशैलीतील गणेश वंदना सादर केली. यानंतर 'आम्ही कोल्यांची पोर हाय हो, आम्हाला दर्याची भीती नाय हो...' या दिपाली होले यांनी बसाविलेल्या कोळीगीतावर नाच करून छोटया दोस्तांनी धमाल उडवून दिली. या कोळीनृत्यात श्रद्धा भिडे, पल्लवी परांजपे, आकृती गुप्ता, आलिशा नाडकर्णी, सानिका बुचे, अक्षय बुचे, सहृद राऊत, कौस्तुभ सराफ, साची टेके, कुणाल सामंत, देवेंद्र काचोळे, श्रुती बोरगांवकर, आदिती शिंदे, अंेय कुळकर्णी, श्रीया मालपाणी, गार्गी खेर हे छोटे दोस्त सहभागी झाले होते. कोळीनृत्यानंतर दिपाली होले यांनीच बसविलेली दिंडी सादर केली अर्णव वैद्य, आशिष ठाकूर, अभिरू राऊत, सानवी होले, चिराग बाविस्कर, निखिल बेलगम, ऋतुजा दुर्वास सोहम पाटील, श्रुती बोरगांवकर, आदिती शिंदे, आदित्य नरसाळे आणि खुशी तायडे या बच्चे कंपनीने.
'गणराज रंगी नाचतो..' या गीतावर भरतनाट्यम आणि कथ्थक अशा एकत्रित नृत्यशैलीने वेदवती गोखले, दुलारी ठाकूर आणि शर्वरी रानडे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर, गार्गी खेर या बालमैत्रिणीने भारतात सुट्टीवर जावून आल्यावर तिथे केलेल्या गमती जमती सांगितल्या तर हर्षवर्धन भिडे याने सादर केलेला 'ब्लूमिंग्टनमध्ये आलेल्या देवतांचा संवाद', श्रद्धा भिडे हिने सांगितलेली 'बोबड्या बहिणींची गोष्ट' आणि अनामय देशपांडे याने सादर केलेली 'लाड' ही सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकरांची कविता हे छोट्या दोस्तांचे कार्यक्रम खूपच भाव खावून गेले.
पुढील कार्यक्रम होता 'स्वरांजली' हा वाद्यवृंद..यामध्ये भक्तीगीतांपासून ते प्रेमगीतांपर्यंत सगळ्या गीतांचा समावेश करण्यात आला होता. ज्योती आनंद यांनी गायलेल्या गणेश स्तवनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. मानसी जोशी - सिंग यांनी गायलेले 'नरवर कृष्णासमान' हे नाट्यसंगीत तर श्रोत्यांना संगीत नाटकांच्या जमान्यातच घेवून गेले. याशिवाय राजेश चलम, आरती वाडेकर, पुष्कराज जहागिरदार आणि निलेश ताम्हाणे यांनी सादर केलेली गाणीही श्रवणीय होती. या गायकांना वाद्यांवर साथ करणारे कलाकार होते प्रसन्न माटे, समीर बेंद्रे, प्रसाद जोशी आणि विनोद आनंद. सूत्रसंचालन केले होते ज्योती कान्हेरे यांनी.
यानंतर 'करायला गेलो एक आणि...'या विषयावर तीन वेगवेगळ्या नाटिका सादर करण्यात आल्या. पहिल्या नाटिकेमध्ये सहभाग होता रोहन रानडे, शर्वरी रानडे, जयेश मोहिते आणि सुनील मुंडले यांचा, द्वितीय नाटिकेमध्ये अरविंद माळी, प्रमोद होले आणि अजय देशपांडे तर त्तृतीय नाटिकेमध्ये योगेश सावंत, सागर काचोळे आणि सचिन टकले सहभागी झाले होते. या सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तमपणे पार पाडल्या. शेवटच्या नाटिकेला सर्वोत्कृष्ट नाटिका म्हणून गौरविण्यात आले तर उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक अरविंद माळी यांना आणि द्वितीय पारितोषिक योगेश सावंत यांना देण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून काम पाहिले उदेश वैद्य आणि राजेंद्र भिडे यांनी.
तरुणाईच्या आवडत्या 'हिची चाल तुरूतुरू...'या मराठी रिमिक्सवर वैभव शिरोडकर, सुनील मुंडले, जयेश मोहिते आणि मनिष कावळे यांच्या धमाल आणि जोशपूर्ण नाचाने कार्यक्रमाची सांगता झाली. अभिजीत नेरूरकर आणि मंजुषा कळाशीकर यांनी नेटकेपणाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे ध्वनी-संयोजक होते दिलीप पवार.
-अमृता सहस्त्रबुद्धे
कार्यक्रमाची छायाचित्रे
कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२४
२०२३
२०२२
२०२१
२०२०
२०१९
२०१८
२०१७
२०१६
२०१५
२०१४
२०१३
२०१२
२०११
२०१०
२००९
२००८
२००७
२००६
२००५
२००४
२००३
२००२
२००१
२०००