गणेशोत्सव २००४ वृत्तांत


सेंट्रल कॅथलीक स्कूल च्या भव्य सभागृहात दिनांक २५ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव उत्साहाने साजरा झाला.

श्री. अभिजीत दंडवते आणि सौ. ईशा दंडवते यांच्या हस्ते गणेशपूजन व आरती झाली.या दोघांनी उपस्थितांना प्रसादा बरोबरच आरती संग्रहाची छोटी पुस्तिकाही दिली.

रेवा ठाकुर संचलीत संस्कारवर्गाच्या सगळ्या मुलांनी श्लोक म्हटले व कार्यक्रमाची छान सुरवात केली.

लहान मुलांचे ’फ़ॅन्सी ड्रेस’, ’फ़ुगेभाऊ’ या गीता वरचा नाच प्रेक्षकांना खुप भावला.

त्या नंतर झाले वसंत कानेटकर लिखित, मयुरेश देशपांडे दिग्दर्शीत पुनर्जन्मावर आधारित तुफान विनोदी एकांकीका “छू मंतर….’ ! यात भाग घेणारे कलावंत होते…..अमीत रोंगे, अश्विनी देशपांडे, प्रसन्न माटे, मोहीत पोतनीस, शिल्पा कुरुंदकर, प्रशांत मदसनाळ, श्रीधर मंगळवेढेकर,

त्यानंतर सादर झाला ..”अष्टविनायक” या गाजलेल्या मराठी चित्रपटातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा” या गाण्यावर दिमाखदार नृत्याविष्कार.
कलाकार होते.. स्मिता रोंगे, अमीत रोंगे, कांचन बोरगावकर, श्री. बोरगावकर, मेघना पांडे, शिरिष पांडे, दीप्ती तावरे, श्री तावरे, सुनील मुंडले.

सुनील मुंडले या ग्रुप ने सादर केला कोकणातील पारंपारिक “बाल्या” डान्स…टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात प्रेक्षकांनी त्याला उस्फुर्त दाद दिली.

स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाची छायाचित्रे