गणेशोत्सव २००३ वृत्तांत


ब्लूमिंग्टन ज्यु. हायस्कूल मधे दिनांक ६ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव उत्सहात साजारा झाला.

यंदाच्या गणपती चे आकर्षण ठरली “शिकागो स्कायलाईन“ थर्माकोलच्या या देखण्या ईमारती बनवल्या होत्या उत्तम नाईक व अनिकेत वैद्य यांनी.

श्री.राहुल जोगळेकर व सौ.वल्लरी जोगळेकर यांच्या हस्ते गणपती पूजन, आरती आणि प्रसाद वाटप झाले आणि मुलांच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली.

गणपतीच्या गाण्यांवर पारंपारीक “उत्सवी” डान्स केला….. विक्रम करंदीकर, शौमित्र सरदेसाई, अपूर्व परांजपे, आकाश परांजपे, अक्षता वैद्य, अमृता माटे, प्राजक्ता कोरडे, अस्मिता कोरडे यां मुलांनी.

पुढील कार्यक्रम होता पु. ल. देशपांडे लिखित “वयं मोट्ठं खोटं” हे बालनाट्य. दिग्दर्शन केलं होतं राजेंद्र भिडे यांनी. सहभागी बालकलाकार होते…. हर्षवर्धन भिडे, रेणू जोशी, नीरज जोशी, विक्रम करंदीकर, नीयती कुलकर्णी, राहुल एकबोटे.

यानंतर झाला गाण्याचा कार्यक्रम. सिंथसाईजर वर होते शैलेश जोशी, तबला चंद्रशेखर वझे, ताल वाद्य प्रसन्न माटे, निवेदन अमित रोंगे. प्रथम सौमीत्र सरदेसाई या बालकलाकाराने स्वरगंगेच्या काठावरती” सादर केले. त्या नंतर… शैलेश जोशी, मनोज आपटे, मधुरा पेठे, समीर जोगळेकर, शैलेश पै या गायकांनी सदबहार गीते पेश करुन कार्यक्रमात रंगत आणली.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमात आणखी धमाल आणली आनंद धर्माधिकारी यांनी. त्यांनी सादर केले “वऱ्हाड निघालंय लंडनला”……… प्रेक्षकांनी त्यांना भरभरुन दाद दिली.

त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची संगता झाली.

कार्यक्रमाची छायाचित्रे

 

 

 

 

 

 

 

 


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००