अभिप्राय

================================================

नृत्याविष्कार (“मी मराठी”) - २००७

From: "Mayuresh Deshpande"
Subject: भले शाब्बास... !!!
Date: Monday, 24 September, 2007 3:31 PM
To: Sunil Mundle, Jayesh Mohite

सुनील-जयेशः

पारणं फेडलंत परवा. अभिमानाने छाती फुगून आली, अंगावर रोमांच आणि डोळ्यात चक्कं पाणी उभं केलंत. आणि हे फक्त माझंच नाही तर त्या हॉलमधल्या सगळ्यांचंच असणार याची मला खात्री आहे. अनुभवाने सांगतो मराठी माणसाच्या या भावना अशा उचंबळून आणणं ही फारशी सोपी गोष्ट नाही :o) पण तुम्ही ती साधलीत.

काही कलाकृती इतक्या चांगल्या असतात की एक कलाकार म्हणून त्यात आपला सहभाग नसल्याची मनाला भयंकर रुखरुख लागते. ही कलाकृती तशी होती. प्रत्येक वेळा वाटत होतं की, अरे हे सादर करायला आपण का नव्हतो स्टेजवर.

काल मी प्रत्यक्ष "मी मराठी"चा व्हिडीओ पाहिला आणि तुमच्या सृजनशीलतेचे आणखीनच कौतुक वाटले. गाणं छान आहे पण त्या व्हिडीओत कल्पकता काहीच वाटली नाही, जी तुमच्या कार्यक्रमात ठिकठिकाणी दिसत होती. अतिशय परिणामकारक आणि मुख्य म्हणजे नव्या आणि जुन्याचं अगदी योग्य मिश्रण असणारी. कुठेही अवास्तव आक्रमकपणा नाही की अगदीच साधं पण नाही.
आपल्या मंडळाचे सगळेच कार्यक्रम खणखणीत असतात, पण काही कार्यक्रम अगदी दृष्ट लागावी इतके परिणामकारक असतात. हा त्यातलाच एक.

परवा कोणीतरी गमतीत त्याच्या कॉलेजचा किस्सा सांगत होता, मराठी बोलायचं, मराठी वाङमय मंडळाच्या वाटेला फिरकायचो नाही, लोक हसतील या भितीने... मला खात्री आहे हा कार्यक्रम पाहिल्यावर त्याची ती विचारसरणी नक्की बदलेल.

कृपया माझ्या हे अभिनंदन आपल्या सर्व संघाला पोचवावे ही विनंती. आशा करतो कोणीतरी याचं मागून रेकॉर्डिंग केलं असेल. मी इतका भारावून गेलो की पुन्हा एकदा सादर केलंत तेव्हा ते मला करता येईल याची जाणीवच झाली नाही. ते रेकॉर्डिंग न चुकता गुगल व्हिडीओ/ यू ट्युब वर टाका.

पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.

- मयुरेश

================================================

कार्यक्रम २००७ - संक्रांत

From: gouri karandikar
Subject: Sankrant 2007
To: "Arati Kulkarni, Upendra Wagh, Uday Paranjape, Rahul Khandekar, Prasad Joshi, Prasanna Mate, Shweta Jamsandekar
Date: Monday, January 22, 2007, 8:24 AM

Hello

Hearty congratulations to all of you for your great performance.....!

All the songs were greatly appreciated by the audience. You all deserve the credit because you made this possible.

Prasad Joshi's Dholki added flavor to "Tak dhina dhin"

Aarati thanks for your participation.

For you and Prasad,..commuting from Peoria was not easy especialy in this weather condition but both of you worked really hard to make this event wonderful.

Manasi you proved to be a good coordinator along with good singer..keep it up.

Once again hearty congratulations...!

Gouri

================================================

आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद!

आपले
ब्लुमिंग्टन् नॉर्मल मराठी मंडळ


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००