FAQ


१. ब्लुमिंग्टन् मध्ये मी नवीन आहे मला मराठी मंडळाचा सभासद कसे होता येईल?

सभासद होणे अगदी सोपे आहे. त्यासाठी ... sampark@bmmandal.org या पत्त्यावर ईमेल पाठवा किंवा येथे क्लिक करून फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा.

2 मंडळाची वार्षिक सभासद वर्गणी आहे का?

वार्षिक सभासद वर्गणी नाही. आपल्या गावातील floating population चे स्वरूप लक्षात घेता वेगळी सभासद वर्गणी न ठेवता कार्यक्रमा साठी होणाऱ्या खर्चाचे नियोजन फक्त तिकिटाच्या रकमेतूनच करण्याचे मंडळाने ठरवले. हे आपल्या सर्वांनाही सोयीचे आहे, प्रत्येकजण आपल्या आवडीचा कार्यक्रम निवडू शकतो.

3 कार्यक्रमाचे तिकीट कसे काढायचे?

खालील पैकी कोणताही पर्याय आपण निवडू शकता
-- ZELLE to Marathi Mandal using email ID
-- Personal Check payable to “MMBN” Or “Marathi Mandal Bloomington-Normal”
कार्यक्रमाच्या आमंत्रणाबरोबर या विषयी अधिक माहिती पाठवण्यात येते.

४ मंडळाचे वर्षभरात एकंदर किती कार्यक्रम होतात?

संक्रांत, गणेशोत्सव, गुढीपाडवा,आषाढी एकादशी असे मुख्य चार कार्यक्रम असतातच.आषाढीला निघणारी पालखी पंढरीच्या वारीचा आनंद देते, मंडळाचे ढोल ताशा लेझीम पथक गणेशोत्सवाला एक वेगळीच ऊर्जा देते याशिवाय , भारतातून येणाऱ्या पालकांसाठी काही कार्यक्रम , मराठी सिनेमाचे आयोजन , ,कार्यशाळा, असे कार्यक्रम असतात .या शिवाय आपल्या मंडळाची मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे "सन्मित्र ग्रंथालय " अधिक माहिती साठी या ईमेल ID वर ई-मेल करा sampark@bmmandal.org
लहान मुलांसाठी मराठी शाळा आहे अधिक माहिती साठी या ईमेल ID वर ई-मेल करा sampark@bmmandal.org

५ मराठी मंडळात सहभागी होण्याने काय साध्य होते?

कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी एकत्र येतात, नवीन ओळखी होऊन तुमचा मराठी मित्रपरिवार वाढतो. मंडळातर्फे साजरी केले जाणारे उत्सव पाहून आणि पुढील पिढीलाही आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची ओळख होते. सगळ्यांच्याच कलागुणांना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळते. तेंव्हा सातासमुद्रापार मराठीचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत जरूर सामील व्हा.

६ स्वयंसेवक म्हणून मला मराठी मंडळाच्या कार्यक्रमात मदत करता येईल का?

हो, आपले स्वागतच आहे. मंडळाला स्वयंसेवकांच्या बहुमूल्य मदतीची नेहमीच आवश्यकता आहे यासाठी कृपया sampark@bmmandal.org या पत्त्यावर मंडळाशी संपर्क साधा.

७ मंडळाच्या कार्यक्रमात कसे सहभागी होता येईल ?

कृपया sampark@bmmandal.org या पत्त्यावर email पाठवा. त्यात आपल्या कलागुणांविषयी माहिती जरूर पाठवा. आपले स्वागतच आहे.

८ RSVP देणे का आवश्यक आहे?

आपली RSVP खूप महत्वाची आहे. RSVP म्हणजे तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित रहाणार असल्याचे कळवणे. RSVP देण्यासाठी Facebook invite किंवा मंडळाच्या ईमेल ला कृपया Reply करा. कार्यक्रमाला उपस्थित रहणाऱ्यांची संख्या आधी समजल्याने कार्यक्रम जास्त चांगल्या प्रकारे आयोजित करायला खूप उपयोग होतो.

९ कार्यक्रमाच्या तिकिटात कोणकोणत्या खर्चाचा समावेश असतो?

मुख्यत: सभागृहाचे भाडे , PA system भाडे, भोजन/ अल्पोपहार , बेबी सिटींग व्यवस्था , liability insurance, व इतर खर्च या सगळ्याचा समावेश असतो.

१० स्वयंसेवक व कार्यक्रमातील कलाकार यांनाही तिकीट काढावे लागते का?

हो, आपल्या मंडळाची वेगळी वार्षिक सभासद फी नसल्याने स्वयंसेवक, प्रेक्षक ,कलाकार अशा सर्वच उपस्थितांनी तिकीट काढणे अपेक्षित आहे.

११ प्रत्येक कार्यक्रमाला बेबी सिटींग ची सोय असते का?

मंडळ प्रत्येक कार्यक्रमाला बेबी सिटींग ची सोय करण्याचा जरूर प्रयत्न करते.
विशेष सुचना –बेबी सिटींग ची व्यवस्था फक्त वय वर्षे ३ व त्या पुढील वयोगटातील मुलांसाठी असते.

१२ सभागृहात खाद्यपदार्थ नेण्यास / खाण्यास मनाई का आहे?

सभागृहाच्या व्यवस्थापनाने स्वच्छता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून केलेला हा नियम आहे. नियमभंग होऊ नये या साठी केलेल्या सहकार्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

१३ Dinner Boxes कार्यक्रम संपण्यापूर्वीच मिळू शकतील का?

कार्यक्रम संपल्या नंतरच Dinner Boxes घेणे अपेक्षित व सोयीस्करही आहे. परंतु काही वेळा प्रकृतीच्या कारणास्तव याला अपवाद करता येईल.

१४ कार्यक्रमात अमराठी भाषिक सहभागी होऊ शकतात का ?

हो नक्कीच ..! मराठी भाषा आणि संस्कृती विषयी उत्सुकता असणाऱ्या अमराठी भाषिकांचे मंडळाच्या कार्यक्रमात नेहमीच स्वागत आहे, पण सर्व कार्यक्रम मराठीत असतात याची कृपया नोंद घ्यावी.

१५ "मराठी शाळा"

३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी ऑगस्ट ते मे दर रविवारी सकाळी १० वाजता आपल्या मंदिरात मराठी शाळा असते (Hindu Temple --HTBN )
मराठी शाळेत मुलं आपली मराठी भाषा तर शिकतातच त्या बरोबरच त्यांना मराठी सण ,मराठी खाद्य पदार्थ ,मराठी खेळ यांचीही माहिती मिळते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मराठीत बोलायला त्यांच्या वयाचे मित्र मिळतात.
शाळेत प्रवेश घेण्यासाठी मंडळाच्या या ईमेल ID वर ई-मेल करा

१६ FAQ मध्ये समावेश नसलेले प्रश्न मला असतील तर त्या प्रश्नांची उत्तरे कोठे मिळतील?

कृपया आपले प्रश्न sampark@bmmandal.org या पत्त्यावर पाठवावेत. आपल्या प्रश्नांचे/ सूचनांचे नेहमीच स्वागत आहे.

मंडळ आपल्या स्नेहपूर्ण सहकार्या बद्दल आभारी आहे. कळावे लोभ असावा.