नमस्कार,
मराठी मंडळ ब्लुमिंग्टन् नॉर्मल संकेत स्थळावर हार्दिक स्वागत!!!!!
२०२४च्या कार्यक्रमासाठी येथे क्लिक करा.
२०२३च्या कार्यक्रमासाठी येथे क्लिक करा.
२०२२च्या कार्यक्रमासाठी येथे क्लिक करा.
२०२१च्या कार्यक्रमासाठी येथे क्लिक करा.
२०२०च्या कार्यक्रमासाठी येथे क्लिक करा.
आपण कोविडमध्ये खूप ऑनलाइन कार्यक्रम घेतले आहेत ते कृपया आपल्या फेसबुकवर आणि आपल्या YouTube जाऊन नक्की बघा
अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील I-55 या महामार्गावर शिकागोच्या दक्षिणेला असलेली ब्लुमिंग्टन् आणि नॉर्मल ही दोन जुळी गावं.
१९९९ च्या अखेरीला नोकरी धंद्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने मराठी मंडळी इथे गोळा होवू लागली आणि १२ फेब़ुवारी २००० रोजी रथसप्तमी च्या शुभमुहूर्तावर तत्कालीन उत्साही मराठी मंडळींच्या पुढाकाराने आणि बुजुर्ग ब्लुमिंग्टनवासियांच्या आशिर्वादाने एका छोट्याशा परिचय समारंभात ब्लुमिंग्टन् – नॉर्मल मराठी मंडळाची स्थापना झाली.
ब्लुमिंग्टन् – नॉर्मल व आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी मंडळी एकत्र यावीत हा मूळ हेतू.
आपल्या ब्लुमिंग्टन् – नॉर्मल मराठी मंडळाच्या सभासदत्वासाठी प्रवेशशुल्क नाही. प्रत्येक कार्यक्रमाबद्दल सभासदांना इ-मेल कळवण्यात येते. ज्या सभासदांकडून दिलेल्या वेळेत ठरलेली वर्गणी मिळेल त्यांना कार्यक्रमात सहभागी होता येते. प्रत्येक कार्यक्रमाची वर्गणी वेगळी असू शकते.
या वेबसाईट वरील 'संपर्क' ही लिंक वापरून मंडळाचे सभासद होता येईल, मंडळाच्या भावी कार्यक्रमांची माहिती मिळवता येईल किंवा कार्यक्रमातील आपल्या सहभागाबद्दल विनंती करता येईल.
वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल आभार.
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्टन् नॉर्मल